Rajyog saam tv
राशिभविष्य

Ruchak Rajyog: दिवाळीपूर्वी मंगळामुळे बनणार खास राजयोग; 'या' ३ राशींच्या घरी येणार पैसाच पैसा

Ruchak Mahapurush Rajyog 2025 Effects: हिंदू धर्मात दिवाळीचा सण सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह लवकरच एक विशेष राजयोग तयार करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम आणि तेजाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या प्रखरतेमुळे त्याला अग्नीप्रमाणे दाहक मानले जाते आणि त्याच्या योद्धा स्वभावामुळे त्याला ‘ग्रहांचा सेनापती’ असं म्हटलं जातं. येत्या सप्टेंबर महिन्यात मंगळ स्वतःच्या स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे 'रुचक राजयोग' तयार होणार आहे.

रुचक राजयोग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, रुचक राजयोगाला महापुरुष योग देखील म्हटलं जातं. हा एक अत्यंत शुभ आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारा योग आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या नशिबात मोठा बदल घडू शकणार आहे. करिअरमध्ये यश, आर्थिक फायदा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

सिंह राशि (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. दिवाळीपूर्वीच करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. नवीन गाडी किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार तुम्ही करू शकता. एकंदरीत जीवनात भौतिक सुखांची भर पडेल.

कर्क राशि (Cancer)

कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात उत्तम नोकरीची संधी मिळू शकणार आहे. दुसऱ्या कंपनीकडून चांगले जॉब ऑफर येण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पत्नी किंवा कुटुंबासाठी सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करू शकता. काही सामाजिक पुरस्कार देखील मिळू शकतात.

वृश्चिक राशि (Scorpio)

वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ स्वतः या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल होईल. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनुभाऊची मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Live News Update: शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

SCROLL FOR NEXT