Samsaptak Yog 2025: २८ जुलैपासून या राशींचं नशीब पालटणार; न्यायाधीश शनी बनवणार खास योग

July 28 Shani Yog: शनिदेव हे कर्म, न्याय, शिस्त, धैर्य आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहेत. ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनिची स्थिती शुभ असल्यास व्यक्तीला प्रचंड यश, स्थिरता आणि धन प्राप्त होते, तर अशुभ असल्यास आव्हानांना सामोरे जावे लागते.
Conjunction Of Shani And Budh
Conjunction Of Shani And Budhsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतात. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. भूमिपुत्र मंगळ 28 जुलै रोजी रात्री 08:11 वाजता सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 13 सप्टेंबरपर्यंत मंगळ याच राशीच भ्रमण करणार आहे.

अशातच मीन राशीत शनि वक्री अवस्थेत आहेत. अशा स्थितीत शनि आणि मंगळ यांच्यात समसप्तक योग तयार होत आहे. या परस्पर दृष्टिसंबंधामुळे बारा राशींमध्ये कुणाच्या ना कुणाच्या जीवनात बदल होणार आहेत. हे बदल कसे असणार आहेत ते पाहूयात.

Conjunction Of Shani And Budh
Shani Margi: 30 वर्षांनंतर शनीदेव गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मेष रास

मेष राशीसाठी मंगळ सहाव्या भावात विराजमान राहतील आणि त्यांच्यावर शनीची दृष्टि राहणार आहे. या समसप्तक योगातून एकीकडे लाभ तर दुसरीकडे सावधगिरीची गरज असे मिश्र परिणाम मिळू शकतात. आयात‑निर्यात, ओवरसीज सर्व्हिसेस किंवा परदेशी क्लायंट्सशी संबंध आहेत त्यांना ठोस फायदा होऊ शकतो. कोर्ट‑कचेरी, कर्ज किंवा आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा परवडणार नाही.

तूळ रास

तुला राशीच्या कुंडलीत मंगळ बाराव्या भावात जात आहेत. तुमच्यासाठी मंगळ हा धन आणि व्यापाराचा स्वामी असल्याने खर्च वाढण्याचे संकेत आहेत. परदेशात नोकरीचा विचार करणाऱ्यांना योग्य प्रयत्न केल्यास सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. शनि‑मंगळ समोरासमोर असल्यामुळे मानसिक ताण, झोपेचे चक्र, आणि काहींमध्ये रक्तदाब किंवा स्नायूंशी संबंधित अस्वस्थता जाणवू शकते.

Conjunction Of Shani And Budh
Budhaditya Raj Yog: 12 महिन्यांनी बुधाच्या राशीत बनणार पॉवरफुल योग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मकर

शनी आणि मंगळ या संयोगामुळे नवीन शिकण्याच्या संधी, करिअरमध्ये दिशा बदल, तसेच आध्यात्मिक झुकाव वाढण्याची शक्यता आहे. आयात‑निर्यात करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक, पण जोखीम समजून घेतल्याशिवाय पावलं टाकू नयेत. मंगळाची चौथी दृष्टि त्याच भावावर पडत असल्याने खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात.

Conjunction Of Shani And Budh
Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com