Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: होळीनंतर न्यायदेवता शनी करणार राशी बदल; 'या' राशींचं भाग्य उजळणार, बरसणार शनीदेवाची कृपा

Shani Gochar 2025: मीन राशीत शनीचं भ्रमण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. तर यावर्षी होळी १४ मार्च २०२५ रोजी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठरलेल्या वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनी एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष राहतो. तर या वर्षाच्या मार्च महिन्यात शनी गोचर करणार आहेत.

होळीनंतर शनि जवळजवळ ३० वर्षांनी कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे. मीन राशीत शनीचं भ्रमण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. तर यावर्षी होळी १४ मार्च २०२५ रोजी आहे. शनि सुमारे अडीच वर्षे मीन राशीत राहणार असून शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व १२ राशींवर परिणाम होताना दिसणार आहे. शनीच्या गोचरमुळे काही राशींना नोकरीसह व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर खूप शुभ राहणार आहे. तुमच्या कर्मभावात शनी ग्रहाचं भ्रमण होणार आहे. शनीच्या प्रभावामुळे तुमची नोकरीची परिस्थिती चांगली राहणार आहे. नोकरीत बढती मिळून उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

धनु रास

शनीच्या राशीतील बदल धनु राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. शनी तुमच्या राशीच्या चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. शनीच्या प्रभावामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन चांगलं राहणार आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर भ्रमण फायदेशीर ठरणार आहे. शनी तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करणार आहे. शनीच्या गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात वडिलांकडून सहकार्य मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT