Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shani Nakshatra Parivartan 2025: दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार, या सणानंतर ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल काही राशींसाठी खूप शुभ परिणाम घेऊन येतात. दसरा संपल्यानंतर न्यायप्रिय ग्रह शनी (Saturn) आपल्या स्थितीत मोठे बदल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाचे देवता आणि दंडाधिकारी मानलं जातं. कारण शनि माणसाच्या कर्मांनुसार फळ देतात. साधारण दीड वर्षांनी शनि त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी ते मध्येच नक्षत्रांमध्येही बदल करतात. या वर्षी मार्च २०२५ मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे.

आता दसऱ्यानंतर ३ ऑक्टोबरच्या रात्री शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रातून निघून गुरुच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्र बदलामुळे काही राशींवर विशेष कृपा होणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक घडामोडी घडतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचं ह नक्षत्र गोचर लाभदायक ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. पदोन्नतीची संधी मिळू शकणार आह. बराच काळ अडकलेला पैसा परत मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणूक करण्यासाठीही हा काळ उत्तम आहे.

मकर राशी

शनि नक्षत्र परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. अचानक अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीपासून फायदा होण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष यश देणारा ठरेल.

कुंभ राशी

कुंभ राशी ही शनिदेवांची स्वतःची राशी असल्यामुळे या राशीवर शनि विशेष कृपा करतात. ३ ऑक्टोबरला होणारा हा नक्षत्र गोचर कुंभ राशीच्या जातकांना सकारात्मक फळ देईल. नोकरीत बदल होऊ शकतो. भाग्याची साथ मिळेल व अडथळे दूर होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

SCROLL FOR NEXT