shani margi 2024 saam tv
राशिभविष्य

Shani Margi 2024: दिवाळीनंतर शनीदेव 'या' राशींना करणार मालामाल; प्रत्येक कामातून मिळणार पैसा

Shani Margi 2024: दिवाळीच्या नंतर शनी देव त्यांच्या स्थितीत बदल करणार आहेत. 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता शनी मार्ग्रस्थ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक वेगळं महत्त्व आहे. यामध्ये शनी देवाला देखील विशेष स्थान देण्यात आलं आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. ज्याप्रमाणे शनी गोचर करतो, त्याचप्रमाणे तो मार्गस्थ देखील होतो.

शनि ग्रह सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. मार्च 2025 पर्यंत शनी देव याच राशीत राहणार आहेत. दिवाळीच्या नंतर शनी मार्गस्थ होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे.

हिंदू पंचांगानुसार, 30 जूनपासून कुंभ राशीमध्ये शनी वक्री चाल चालतोय. तर 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता शनी मार्ग्रस्थ होणार आहे. शनीच्या या स्थिती बदलामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्ग्रस्थ होणं फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहील. उच्च शिक्षणासाठी विदेशाता जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकणार आहे. कुटुंबामध्ये काही कलह असतील तर ते दूर होणार आहेत.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यासोबतच तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही अनेक फायदे मिळणार आहेत. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर यश मिळू शकतं.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी चाल हालचाल खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Stone Pelting: जळगाव ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT