Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Vakri: 500 वर्षांनंतर दिवाळीला शनी चालणार वक्री चाल; नव्या नोकरीसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

Shani Dev Vakri In Meen: दिवाळी, अर्थात लक्ष्मीपूजनाचा काळ हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून, तो धन, वैभव आणि भाग्याचे प्रतीक मानला जातो. यंदाची दिवाळी अनेक वर्षांच्या इतिहासात एक अत्यंत दुर्मिळ आणि मोठा ज्योतिषीय बदल घेऊन येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रह व्रत-उपवास आणि सणांच्या काळात मार्गी आणि वक्री उलटी गतीने संचरतात. याचा परिणाम केवळ व्यक्तीच्या आयुष्यावरच नाही तर देश-विदेशातील घडामोडींवरही स्पष्टपणे दिसून येतो. २० ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे.

त्याच दिवशी न्यायाधीश आणि कर्मफळ दाता मानले जाणारे शनि देव वक्री गतीने मीन राशीत भ्रमण करणार आहेत. या काळात काही राशींच्या जीवनात भाग्याची साथ लाभण्याची शक्यता निर्माण होणार आहे. धन-समृद्धी वाढण्याबरोबरच परदेश प्रवासाचेही योग जुळू शकतात. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनि देवाची वक्री गती व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना योग्य संधी मिळू शकणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येणार आहे. आर्थिक बाबतीतही हा काळ लाभदायक ठरणार आहे. संपत्तीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि देवाची वक्री गती सकारात्मक परिणाम देणारी ठरू शकणार आहे. शनि देव तुमच्या राशीपासून धन आणि वाणी स्थानात उलटी चाल चालणार आहेत. तुमच्या राशीवर त्यांचे स्वामित्वही आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीमध्ये प्रभाव वाढणार आहे. ज्यामुळे लोक प्रभावित होतील.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनि देवाचं वक्री होणं शुभ संकेत देणारे ठरू शकणार आहे. शनि देव तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात वक्री राहणार आहे. कुटुंबाची साथ आणि पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या अडचणी कमी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी खासदार नवनीत राणा यांचं पुन्हा बाबरीची वीट रचणाऱ्यांना ट्विट करून दिले आव्हान

Diabetes Fruits Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? तज्ञांनी सांगितली यादी, एकदा वाचाच

Makeup Tips: मेकअप केल्यावर चेहरा काळा पडतो? मग या सोप्या स्टेप्स करा फॉलो पार्टीमध्ये तुम्ही दिसाल ग्लॅमरस

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

SCROLL FOR NEXT