Jupiter And Shani Vakri  saam tv
राशिभविष्य

५०० वर्षांनंतर दिवाळील बनतोय गुरु-शनीचा दु्र्मिळ संयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

Jupiter And Shani Vakri 2024: 500 वर्षांनंतर, कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये वक्री राहतील. या दोन्ही ग्रहांची वक्री स्थिती कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jagdish

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरप्रमाणे ते त्यांची स्थिती देखील बदलतात. यावर्षी दिवाळीचा सण 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. अशातच 500 वर्षांनंतर, कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये वक्री राहतील.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, यावेळी गुरू ग्रह देखील वृषभ राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करणार आहेत. जाणून घेऊया या दोन्ही ग्रहांची वक्री स्थिती कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे.

मकर रास

गुरु आणि शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. याशिवाय तुम्हाला अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. नवीन व्यावसायिक करार होणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शनिदेवाची वक्री गती शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीपासून दहाव्या भावात आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर येणार आहेत. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान राहणार आहे. अविवाहित लोक लग्न करू शकतात.

वृश्चिक रास

बृहस्पति आणि शनिदेवाची वक्री हालचाल तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. विवाहित लोकांचं आयुष्यात प्रेम वाढणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या कामात यश गाठता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT