Shani Uday 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Dev Uday: 30 वर्षांनंतर या राशी घेणार श्रीमंतीकडे झेप; प्रत्येक कामातील अडथळे होणार दूर

Shani Dev Uday In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहयोग ३० वर्षांनंतर विशेष परिणाम देतात. या कालावधीत काही राशींना संपत्तीचा लाभ मिळणार असून त्यांच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर काही ग्रह उदय आणि अस्त होतात. त्याचे परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. कर्म देणारा आणि न्यायाधीश शनिदेव एप्रिल २०२६ मध्ये उदय होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, मीन राशीत शनिदेव उदय होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. याव्यतिरिक्त, नवीन नोकरीमुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशींना चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शनीचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाणार आहे. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील. या काळात नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायाच्या संधी फायदेशीर ठरणार आहे.

मकर रास

शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात उदय होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य देखील वाढू शकतं.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शनीचा उदय शुभ ठरू शकणार आहे. तुमचे धैर्य आणि संतुलित निर्णय तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देणार आहेत. तुम्हाला गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

राजकारणात पुन्हा भूकंप होणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? VIDEO

Maharashtra Corporation Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीत रक्ताचा सडा, खोपोली पाठोपाठ अकोल्यातही हत्याकांड

SCROLL FOR NEXT