Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Trishansh Yog 2025: 30 वर्षांनी कर्मदाता शनीने बनवला अद्भुत योग; 'या' राशींची होणार अचानक चांदीच चांदी

Shani Dev blessing: शनिदेव, तब्बल ३० वर्षांनंतर एका अद्भुत योगाची निर्मिती करत आहे. हा योग काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. या योगाच्या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यात अचानक मोठा बदल होईल.

Surabhi Jayashree Jagdish

शनि हा कर्मफलदाता ग्रह मानला जातो आणि नवग्रहांमध्ये तो सर्वात प्रभावी ग्रह मानला जातो. कारण शनि हा मनुष्याला त्याच्या कर्मांप्रमाणेच फळ देतो. याशिवाय तो इतर ग्रहांच्या तुलनेत अतिशय धीम्या गतीने फिरतो. त्यामुळे शनि एका राशीत जवळपास दोन अडीच वर्षे राहतो आणि पुन्हा त्या राशीत यायला त्याला साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो.

या प्रवासादरम्यान तो इतर ग्रहांसोबत युती करतो. सध्या गुरु मिथुन राशीत असताना शनी त्याच्यासोबत संयोग करून त्रिदशांश योगाची निर्मिती करणार आहे. या विशेष योगाचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येणार आहे. मात्र तीन राशींना त्याचा विशेष लाभ होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना त्याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरु आणि शनि एकमेकांपासून १०८ अंशावर असतात. तेव्हा त्रिदशांश योग तयार होतो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना संपत्ती, मान-सन्मान आणि यश प्राप्त होते. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि गुरु मिथुन राशीत विराजमान आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरु-शनीचा त्रिदशांश योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. शनिच्या वक्री अवस्थेमुळे विशेष लाभ मिळेल. तर गुरुच्या धनभावातील स्थितीमुळे अचानक धनलाभ होण्याचे योग तयार झाले आहेत. बराच काळ अडथळे येत असलेले काम आता सुरळीत पार पडू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या जातकांसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबातील जुन्या समस्या मिटू शकणार आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. व्यापाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे आकर्षण वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT