Mars luck April 3 zodiac signs saam tv
राशिभविष्य

Saturn Mercury rare yoga: 30 वर्षांनंतर शनी आणि बुधाने बदलली चाल; या राशींना मिळणार छप्परफाड पैसा, सुवर्णकाळ होणार सुरु

zodiac signs will get money: ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि बुध ग्रहांनी आपला मार्ग बदलला आहे. या दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे काही राशींना प्रचंड आर्थिक लाभ मिळणार असून त्यांच्या जीवनात संपत्ती आणि यशाचा काळ सुरू होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात कर्मफल दाता शनि आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात. बुध साधारण 15 दिवसांत राशी परिवर्तन करतो तर शनि सुमारे दोन-दीड वर्षांनी राशी बदलतो. वैदिक ज्योतिषानुसार, बुध बुद्धी, तर्क, वाणी, संचार, ज्ञान, शिक्षण, बौद्धिक क्षमता, एकाग्रता आणि व्यापाराचा कारक आहे. तर शनि कर्म, न्याय, अनुशासन, आयुष्य, रोग, दुःख आणि स्थैर्याचा कारक मानला जातो.

सध्या शनि मीन राशीत विराजमान असून 28 नोव्हेंबरला तो मार्गी झालाय. दुसरीकडे बुध धनु राशीत 29 नोव्हेंबरला मार्गी झाला आहे. शनी आणि बुधाच्या मार्गी होण्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. हा काळ काही राशींसाठी शुभ असणार आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या जातकांसाठी शनी आणि बुध मार्गी होणं अत्यंत लाभदायी ठरणार आहे. शनि तुमच्या राशीच्या भाग्यभावात आणि बुध सहाव्या भावात मार्गी होणार आहे. त्यामुळे नशिबाचा साथ मिळणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता वाढणार आहे. मानसिक संतुलन राहणार आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या जातकांसाठी शनि आणि बुध मार्गी होणं अत्यंत शुभ ठरणार आहे. शनि दशम भावात आणि बुध सातव्या भावात मार्गी होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या जातकांसाठी शनि आणि बुध मार्गी होणं भाग्य उजळवणारं ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींची अनेक वर्षांपासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यास यश मिळणार आहे. व्यापारातही मोठा फायदा होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Muncipal Elections : अकोल्यात महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला किती जागा? वाचा

भाजपनं केरळमध्ये रचला इतिहास, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान; विधानसभा निवडणुकीआधीच मोठे संकेत

Maharashtra Live News Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का

त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायाचे, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Hair Care : केसांना सतत काळी मेहंदी लावल्याने काय नुकसान होते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT