Surya Grahan 2025 saam tv
राशिभविष्य

Surya Grahan 2025: 199 वर्षांनंतर बनला महासंयोग; 'या' राशींचे सुरु होणार चांगले दिवस, मिळणार पैसाच पैसा

Zodiac Good Days : ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीमध्ये ग्रहांचा संयोग घडणार आहे. सूर्यग्रहणाच्या काळात शुक्र, राहू, बुध आणि चंद्र हे मीन राशीत एकत्र येतील. त्यामुळे पंचग्रही योगाचा निर्माण होईल. याशिवाय, सूर्यग्रहणानंतर शनिदेखील या राशीत संचार करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण २९ मार्च म्हणजेच आज आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण खूप खास असणार आहे, कारण या दिवशी सूर्य मीन राशीत आणि उत्तरभाद्रपद नक्षत्रात असणार आहे.

याशिवाय ज्योतिष्य शास्त्रानुसार, मीन राशीत ग्रहांचा मेळ होणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी शुक्र, राहू, बुध आणि चंद्र मीन राशीत असणार आहे. त्यामुळे पंचग्रही योग तयार होणार आहे. यासोबतच, सूर्यग्रहण संपल्यानंतर शनि देखील या राशीत भ्रमण करणार आहे. ज्यामुळे 6 ग्रहांच्या एकत्रित उपस्थितीमुळे महाविष्फोटक राजयोग निर्माण होतोय. दरम्यान हे योग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहेदत ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना लाभ होणार आहेत. सूर्यग्रहण संपल्यानंतर, शनि मीन राशीत प्रवेश करणार असल्याने शनीच्या साडेसत्तीपासून आराम मिळेल. तुमचं जीवन हळूहळू पुन्हा रुळावर येऊ शकणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमच्या आयु्ष्यात असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार आहेत. कोर्टाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल.

धनु रास

सूर्यग्रहण आणि राजयोगांमुळे या राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करून तुम्हाला फायदा होऊ शकतो. राहूची दृष्टी बाराव्या घरावर पडणार आहे. या काळात तुम्हाला परदेशी व्यापारातून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाला गती मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Protest: मराठा बांधवांचा जल्लोष; पाटील बोलते सबको को** | VIDEO

Manoj Jarange Full Name: मनोज जरांगे याचं पूर्ण नाव काय आहे?

Manoj jarange patil protest live updates: पुण्यात मराठा समाजाकडून आनंदोत्सव

Reem Shaikh: वेस्टर्न आउटफिटमधील रीम शेखचे सुंदर लूक, तुम्ही पण करु शकता रिक्रिएट

Accident : टायर फुटल्याने पोलीस कारचा भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT