Lakshmi Narayan Yog Saam tv
राशिभविष्य

Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Lakshmi Narayan Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात, जे मानवी जीवनावर थेट परिणाम करतात. 'लक्ष्मी नारायण राजयोग' हा असाच एक अत्यंत शुभ आणि धनदायी योग मानला जातो

Surabhi Jayashree Jagdish

दैवतांचे गुरू म्हणून ओळखला जाणारा शुक्र ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसून येतो. प्रेम, आकर्षण, सौंदर्य, संपत्ती आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेला शुक्र ग्रह येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी चंद्राच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

यावेळी शुक्र आणि बुध एकत्र येऊन 'लक्ष्मी नारायण योग' तयार करणार आहेत. या शुभ आणि प्रभावी राजयोगामुळे काही राशींना मोठं भाग्य लाभू शकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २१ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजून २५ मिनिटांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्या आधीच बुध ग्रह कर्क राशीत विराजमान असलेला असल्यामुळे या दोघांच्या युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग' तयार होईल. हा योग ३० ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे.

मेष रास (Aries)

या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभदायक ठरू शकणार आहे. या कालावधीत नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकणार आहे. प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून रखडलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.

मिथुन रास (Gemini)

या राशीच्या दुसऱ्या भावात लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्यामुळे हा काळ फारच फलदायी ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला खरेदी करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा आध्यात्मिक कल वाढू शकतो. एखाद्या शुभकार्याच्या आयोजनात तुमचा सक्रिय सहभाग राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीसाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक काही फायदे होऊ शकतात. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लाभ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT