Guru Vakri  saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह होणार वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार धन

Jupiter Retrograde 2024: तब्बल १२ वर्षांनी नवरात्रीमध्ये गुरु वक्री होणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अधिक लाभ मिळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याप्रमाणे काही ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. येत्या काळात गुरु ग्रह नवरात्रीमध्ये वक्री चाल चालणार आहे. तब्बल १२ वर्षांनी नवरात्रीमध्ये गुरु वक्री होणार आहे.

9 ऑक्टोबर रोजी गुरू वृषभ राशीत वक्री होणार असून 4 फेब्रुवारी २०२४ पर्यंत तो या स्थितीत असणार आहे. गुरुच्या वक्री हालचालीचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अधिक लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही चांगला राहणार आहे. तुमच्या करिअरमध्येही तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैसे मिळू शकणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी बदल अपेक्षित होणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचं नात अधिक दृढ होणार आहे.

धनु रास

गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकणार आहे. कष्टकरी लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ पहायला मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहात. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

मिथुन रास

गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळणार आहेत. नशीब तुमच्या बाजूने असू शकतं. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT