Guru Surya Uday saam tv
राशिभविष्य

Guru Surya Uday: 12 वर्षांनंतर गुरु सूर्यासोबत बनवणार खास संयोग; 3 राशींना बिझनेसमधून मिळणार केवळ पैसा

Sun And Jupiter Conjunction In Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि सूर्य यांचा संयोग हा अत्यंत शुभ मानला जातो, कारण सूर्य हा आत्मा, सन्मान आणि नेतृत्वाचा कारक आहे, तर गुरु हा ज्ञान, विस्तार, समृद्धी आणि भाग्याचा ग्रह आहे. त्यांच्या युतीमुळे 'गुरु आदित्य योग' तयार होतो

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्यानुसार, काही ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होतात. ग्रहांच्या या स्थितीमुळे राजयोग निर्माण होतात. ज्याचा सर्व राशींच्या जीवनावर काही ना काही होत असतो.

जुलैच्या सुरुवातीला गुरू मिथुन राशीत उदय होणार आहे. यावेळी तो सूर्य देवाशी युती करणार आहे. अशावेळी या युतीच्या निर्मितीमुळे गुरु आदित्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काहील राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना अचानक भरपूर पैसे मिळू शकणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

गुरु आदित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. गुरु आणि सूर्य तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात गोचर करणार आहेत. या काळात तुमचं उत्पन्न चांगलं वाढू शकणार आहे. या वेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकणार आहे. कोर्टाच्या प्रकरणात तुमच विजय होणार आहे.

वृषभ रास

गुरु आदित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या योजनेवर काम करत असाल तर आता तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या रास

गुरु आदित्य राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. नोकरी शोधणाऱ्या लोकांना यावेळी नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकणार आहेत. तुम्ही या काळात नवीन काम सुरु करू शकता. चांगले पैसे हाती येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT