Shukra  Saam Tv
राशिभविष्य

Shukraditya Yog: 12 महिन्यांनी सूर्य-शुक्र बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार, धनलाभही होणार

Venus And Sun Yuti: मार्च महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी भगवान शुक्र आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत या दोन ग्रहांचा शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. यावेळी दोन ग्रह एकत्र एका राशीत आले की त्यांची युती होते. या दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

मार्च महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी भगवान शुक्र आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत या दोन ग्रहांचा शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. काहींना अचानक पैसे मिळू शकतात. तर काहींना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. काही जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आजारांनी त्रस्त होते त्यांना आता आराम मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल.

मिथुन रास

शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्म घरावर तयार होणार आहे. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि प्रकल्प मिळू शकतात. नोकरदार लोक पदोन्नती किंवा पगारवाढीची अपेक्षा करू शकतात. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

वृश्चिक रास

शुक्रादित्य राजयोग तयार झाल्याने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवू शकणार आहात. प्रेमसंबंध असलेल्यांना यश मिळू शकणार आहे. प्रेमसंबंध विवाहात बदलू शकतात. याशिवाय कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

SCROLL FOR NEXT