Today wednesday Horoscope Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

Aajche Rashibhavishya in Marathi : आजच्या राशीभविष्यानुसार ३ राशींवर स्वामींची विशेष कृपा असून धनलाभाचे योग आहेत. वाचा आजचे १२ राशींचे भविष्य...

Namdeo Kumbhar

मेष (Mesh - Aries)

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. स्वामींच्या कृपेने तुमचे अडकलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखाल. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने जुन्या समस्या सुटण्यास मदत होईल.

शुभ रंग: पिवळा

शुभ अंक: ३

वृषभ (Vrushabh - Taurus)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने व्यापारात मोठे धनलाभाचे योग आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन व्यवसायिक संबंध जोडले जातील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

शुभ रंग: सोनेरी (गोल्डन)

शुभ अंक:

मिथुन (Mithun - Gemini)

आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. नवीन घर घेण्याबाबत कुटुंबात चर्चा होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: काळा

शुभ अंक:

कर्क (Kark - Cancer)

आज जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुम्ही भावूक व्हाल. जोडीदारासोबतचा संवाद वाढल्याने नात्यात गोडवा येईल. व्यवसायात जवळच्या व्यक्तींशी ताळमेळ राखून काम करा. इतरांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळेल.

शुभ रंग: लाल

शुभ अंक:

सिंह (Sinha - Leo)

आज आरोग्याकडे लक्ष द्या, योगासने केल्याने फायदा होईल. एखाद्या स्त्रीच्या मदतीने व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना आज चांगली संधी मिळेल. सकारात्मक विचार ठेवा.

शुभ रंग: पांढरा

शुभ अंक:

कन्या (Kanya - Virgo)

आज कामाचा व्याप जास्त राहील. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर केल्याने नाते अधिक घट्ट होईल. जवळच्या नातेवाईकांशी संवाद साधाल.

शुभ रंग: नारंगी

शुभ अंक:

तूळ (Tula - Libra)

आजचा दिवस निवांत आणि आनंदी असेल. घरातील सजावटीसाठी खरेदीला जाण्याचे योग आहेत. ऑफिसच्या कामामुळे घरी यायला थोडा उशीर होऊ शकतो. मित्रांसोबत भेटण्याचे प्लॅन्स बनतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

शुभ रंग: पीच

शुभ अंक:

वृश्चिक (Vrushchik - Scorpio)

व्यवसायात झालेला फायदा पुन्हा गुंतवणुकीसाठी वापरावा लागेल. महत्त्वाच्या कामात भावंडांचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची बातमी मिळू शकते. जोडीदारासोबतचा वेळ आनंदात जाईल.

शुभ रंग: हिरवा

शुभ अंक: १

धनु (Dhanu - Sagittarius)

अचानक काही खर्च उद्भवू शकतात, पण घाबरून जाऊ नका, लवकरच सर्व नियंत्रणात येईल. रागावर ताबा ठेवावा लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांची साथ मिळेल.

शुभ रंग: निळा

शुभ अंक:

मकर (Makar - Capricorn)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. शेजाऱ्यांना मदत करण्याची संधी मिळेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींशी चर्चा केल्याने प्रश्नांची उत्तरे मिळतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.

शुभ रंग: मरून

शुभ अंक:

कुंभ (Kumbha - Aquarius)

स्वामींच्या विशेष कृपेमुळे जुनी गुंतवणूक आज चांगला परतावा देईल. आर्थिक बाबतीत गांभीर्याने विचार कराल, ज्यामुळे धनवृद्धी होईल. मित्रांसोबत सहलीचा बेत ठरेल. जोडीदाराचा सल्ला तुम्हाला कामात यश मिळवून देईल.

शुभ रंग: ग्रे (राखाडी)

शुभ अंक:

मीन (Meen - Pisces)

तुमच्या कामाचे आज सर्वत्र कौतुक होईल. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी गाठीभेटी झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मित्र आज तुम्हाला एखादी अनोखी भेट देऊ शकतात.

शुभ रंग: मॅजेंटा

शुभ अंक: ८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

कैसे बोगस प्रमाणपत्र बनाया..., सहर शेख यांचं नगरसेवकपद जाणार? बोगस प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं

Okra Water Benefits: भेंडीच्या पाण्यात १ चमचा लिंबू रस टाकून पिण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

SCROLL FOR NEXT