मेष : व्यावसायिक योजनांना वेग मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यात यश मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन संधींचा योग्य फायदा घ्या.
वृषभ : भाग्याची उत्तम साथ मिळेल. वेगवेगळ्या मार्गांनी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील जेष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल.
मिथुन : दैनंदिन कामांवर जास्त लक्ष द्या. व्यापारात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रवासात सावधगिरी बाळगा. घाईत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.
कर्क : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील. भागीदारीतील कामांमध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. वाणी आणि वागणूक नम्र ठेवा.
सिंह : करिअरमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. सेवा क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील.
कन्या : मित्रांसोबत फिरण्याचा योग आहे. करिअर आणि व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
तुळ : कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. पैतृक मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या.
वृश्चिक : संपर्क आणि संवादातून चांगले लाभ मिळतील. व्यावसायिक प्रवास यशस्वी ठरतील. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
धनु : घरात आनंदाचे वातावरण राहील. पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळू शकतात. सर्वांशी प्रेमाने वागल्याने फायदा होईल.
मकर : नवीन संधी शोधण्यात यश मिळेल. करिअरमध्ये प्रतिष्ठा वाढेल. नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल. नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित मिळेल.
कुंभ : उत्पन्नासोबत खर्चही वाढू शकतो. परदेश प्रवासाचे योग आहेत. वाद-विवादापासून दूर राहा. कायदेशीर बाबींमध्ये विशेष काळजी घ्या.
मीन : व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. भागीदारीतील कामांमध्ये यश मिळेल. जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याने मोठे लाभ होतील.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.