Rashi Bhavishya 26 July 2024  Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: पैशांची बरसात होणार, अनेक सुंसधी मिळणार; एका क्लिकवर वाचा आजचा दिवस कसा जाणार?

Rohini Gudaghe, Anjali Potdar

आजचे पंचांग २६ जुलै २०२४

शुक्रवार दिनांक- २६जुलै २०२४, आषाढ कृष्णपक्ष, तिथी- षष्ठी, नक्षत्र-उत्तराभाद्रपदा. योग-सुकर्मा, करण- गरज, रास-मीन, दिनविशेष- उत्तमदिवस.

मेष- कामे रखडण्याची शक्यता

आपण आपली केल्याप्रमाणे कामे होतीलच, अशी शक्यता वाटत नाही. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. एकूणच वादविवाद टाळावेत तर दिवस सार्थकी लागेल.

वृषभ- आर्थिक लाभ होतील

व्यवसायामध्ये वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. मित्र-मैत्रिणींचा सहभागाने नवीन परिचय होतील. स्नेहभोजनाचे योग येतील.

मिथुन - कार्यक्षेत्र वाढणार

राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एकूणच कीर्ती आणि सन्मानाचा आजचा दिवस आहे.

कर्क - भाग्यकारक घटना घडतील

गुरुकृपा लाभेल. भाग्यकारक घटना आयुष्यात घडतील. तीर्थयात्रा, परदेशगमनाचे योग आखणी होईल.

सिंह - खर्चाचे प्रमाण वाढेल

खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शारीरिक आणि मानसिक श्रम होतील. तावून सुलाखून काम कराल.

कन्या- प्रवास होतील

कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागते. प्रवास होतील. व्यवसाय वाढीस लागेल.

तूळ - तक्रारी आणि कटकटी वाढतील

तब्येतीच्या तक्रारी आणि कटकटी वाढतील. वाहने जपून चालवावीत. इतरांकडून सहकार्याची अपेक्षा करूच नका. "एकलाची चलो " हे मार्गक्रमण करा.

वृश्चिक - शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती

शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. संतती सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मनोरंजनाकडे आपला कल राहील.

धनु - शेतीवाडीची कामे मार्गी लागतील

प्रॉपर्टी व्यवहार होतील. कुटुंबीयांबरोबर दिवस व्यतीत करा. शेतीवाडीची कामे मार्गी लागतील. पशुधन जपावे.

मकर - जिद्दीने कार्यरत राहाल

जिद्दीने कार्यरत राहाल. भावंडांचे सहकार्य लाभेल. केलेल्या गोष्टी तर दिसणार नाहीत पण आज नेटाने कराल.पुढे त्याचा फायदा होईल.

कुंभ - खर्चाचे प्रमाण वाढेल

पैशाची आवक-जावक चांगली राहील. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. मोठी गुंतवणुक करताना चार वेळा विचार करा.

मीन - सकारात्मकता वाढेल

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सकारात्मकता वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. ठरवाल ते होईलच असा दिवस आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT