Horoscope Today 26th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशीला मिळतील प्रगतीचे नवे मार्ग; भाग्यकारक घटना घडतील

Horoscope Today Marathi : आजचा रविवार काही राशीच्या लोकांसाठी खूपच खास जाणार आहे. काहींन प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. तर काही लोकांच्या जीवनात भाग्यकारक घटना घडतील.

Anjali Potdar

आजचे पंचाग २६ मे २०२४

वार - रविवार. तिथी - कृ. तृतीया. नक्षत्र - मूळ. योग - साध्य. करण - वाणिज ०६.३६ पर्यंत नंतर विष्टी. संकष्ट चतुर्थी. दिनविशेष - १८ नंतर चांगला.

मेष : भाग्यकारक घटना घडतील.

"भगवान देंता हैं तो छप्पर फाडकें" असा आजचा दिवस आहे भाग्यकारक घटना घडतील. अध्यात्माकडे कौल राहील. दिवस सुखाचा आणि आनंदाचा.

वृषभ : मौल्यवान वस्तू सांभाळा

आपल्या मालमत्ता, वस्तू यांना जपा. शारीरिक आणि मानसिक ससेहोलपट टाळा. कष्ट कष्ट कष्ट असा आजचा दिवस राहील.

मिथुन : चांगल्या गोष्टी कानावर येतील

संततीकडून चार चांगल्या गोष्टी कानावर येतील. त्यामुळे उर भरून येईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार रेंगाळले असतील तर असते मार्गी लागतील. छान दिवस आहे.

कर्क : विनाकारण अडथळे येतील

नोकरीमध्ये विनाकारण अडथळे निर्माण होतील. मना व चित्त शांत ठेवा. हाताखालचे लोक आपल्याविषयी कुभांड रचणार असे दिसते आहे. त्याकडे विशेष लक्ष द्या.

सिंह : आजचा दिवस व्यस्त राहील

कला, क्रीडा, मनोरंजन, इतर ऍक्टिव्हिटी, यामध्ये आजचा दिवस व्यस्त राहील. मुले, आपली प्रगती , तसेच पैसा मिळविणे त्याच्या योजना ..बापरे.एकच दिवस आहे आणि किती गोष्टी करू असा धावपळीचा दिवस आज राहील.

कन्या : वाहने खरेदी करण्याचा योग

गाडी घेण्याचा विचार असेल तर आज त्याचे बेत पूर्ण होतील. कुटुंबीयांशी विचारविनिमय कराल आणि त्या पद्धतीने निर्णय घ्याल. काही वेळेला मनोबल कमी पडेल पण त्याचा खूप विचार करू नका.

तूळ : कामात प्रगतीचा दिवस

कामाच्या क्षेत्रामध्ये प्रगतीचा दिवस. छोटे प्रवास होतील. प्रवासात आनंद मिळेल. आपल्या कामावर आपण खूष व्हाल. इतरांची सुद्धा शाबासकी मिळवाल.

वृश्चिक : उत्साह, उमेद वाढेल

आर्थिक क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकाल. उत्साह, उमेद वाढेल.आपल्या स्वभावाप्रमाणे अनेक गोष्टी करण्यामध्ये आज मन गढून जाईल.

धनू : सर्व अंदाज अचूक ठरतील

ठरवाल तसे होण्याचा आजचा दिवस आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. काही निर्णय तुम्ही घेतले असतील तर ते योग्य ठरतील. सर्व अंदाज अचूक होण्याचा आजचा दिवस आहे.

मकर : काळजीपूर्वक निर्णय घ्या

कामात उत्साह राहील. पण आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. "बंदा रुपय्यां आजकल ज्यादा चलतां हैं" हे लक्षात ठेवा आणि पुढे चला.

कुंभ : कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो

सरकारी कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्याची आधीच तज बीज करा. जुन्या गुंतवणुकी मधून लाभ मिळेल.

मीन : नवे मार्ग मिळतील

नव्या दिशा, नवे मार्ग मिळतील. नावे संबंध प्रस्थापित होतील. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" ही जाणीव राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquito Agarbatti: डास घालवण्यासाठी अगरबत्ती वापरताय? थांबा, ठरु शकते कुटुंबासाठी विषारी; वाचा रिपोर्ट

Maharashtra News Live Update: उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद; ₹१५०० मिळणार नाही, सरकारने सांगितलं कारण

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

Kandyachi Chutney Recipe : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

SCROLL FOR NEXT