trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Trigrahi Rajyog: 30 वर्षांनी सूर्य, शुक्र आणि शनीची होणार युती; 'या' 3 राशी होणार गडगंज श्रीमंत

Sun Shani and Shukra Grah Yuti: मार्चमध्ये सूर्य, शनि आणि शुक्राचा संयोग होणार आहे. गुरुच्या मालकीच्या राशीच्या चिन्हात 30 वर्षांनंतर हा संयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामुळे त्रिग्रही किंवा राजयोग निर्माण होतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. हे तयार होणारे योग काही राशींना लकी असतात. तर काही राशींनासाठी अनलकी ठरण्याची शक्यता असते. येत्या मार्च महिन्यात त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे.

मार्चमध्ये सूर्य, शनि आणि शुक्राचा संयोग होणार आहे. गुरुच्या मालकीच्या राशीच्या चिन्हात 30 वर्षांनंतर हा संयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या राशींना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसंच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकणार आहे. एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

मिथुन रास

तुमच्यासाठी त्रिग्रही योग तयार झाल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या कर्म घरावर तयार होणार आहे. यावेळी तुमचं काम आणि व्यवसाय चमकू शकतात. नोकरदार लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची ही वेळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवा टप्पा गाठण्याची हीच वेळ आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. जुनी गुंतवणूक देखील फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिकांना परदेशातून नवीन व्यवसाय ऑफर मिळू शकतात. तुमचा व्यवसाय वाढणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये २४ वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT