Gopichand Padalkar News | भुईकोट किल्ला पुरातत्व विभागाकडे द्या- पडळकरांच सीएमना पत्र!
श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. किल्ले रायगडाचे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर आपण किल्ले वाफगावचा विकास करावा, अशीही मागणी त्यांनी केली. सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर बहुजन बांधवांस परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावचा भव्यदिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.