आहार आणि आरोग्य

पुणे विद्यापीठात 23 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला आज (सोमवारी) सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

ऋषिकेश आहेर (घारगाव, ता. संगमनेर जि. अहमदनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात तो शिकत होता. आजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर होता.

वसतिगृहात नंबर 4 रुम नंबर 16 मध्ये तो राहायला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला अचानक त्रास होऊ लागला. तो ओरडायला लागल्याने शेजारील इतर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला विद्यापीठातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तो जास्त सिरीयस असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससूनला हलवण्यास सांगितले. ससूनला घेऊन गेल्यानंतर तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik-Agra Highway Accident : नाशिकमध्ये एसटी-बस-ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Wardha Firing : प्रगती बघवत नव्हती; तरुणाकडून आतेभावावर गोळीबार, वर्ध्यात खळबळ

Jitendra Awhad : भटकत्या आत्म्याची ताकद काय आहे, हे त्यांना आता कळेल; जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना इशारा

Today's Marathi News Live : न्यायालय अवमान प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेव यांना मोठा दिलासा

Air Cooler Precautions | कूलरचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

SCROLL FOR NEXT