आहार आणि आरोग्य

मायानगरी मुंबईला जीवघेण्या फेन्टानीलचा विळखा

सकाळ न्यूज नेटवर्क

फेन्टानील, सध्याच्या घडीला बाजारात असलेलं अत्यंत धोकादायक आणि खतरनाक ड्रग्स. याच फेन्टानीलनं अमेरिकेत 33 हजार जणांचा बळी घेतलाय. यावरुन हे ड्रग्स किती विनाशकारी असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल. कोकेन, हेरॉईन, व्हाईटनर सारख्या ड्रग्सनं आजची तरुणपिढी वाया जात असताना यात आता सगळ्यात भयानक अशा फेन्टानील ड्रग्सची भर पडलीय. अमंली पदार्थविरोधी  पथकानं ११६ किलो फेन्टानी ड्ग्स जप्त केलंय.

फेन्टानीलचा वापर ऍनेस्थेशीया, कँन्सर, मनोविकारांवरील औषधामध्ये होतो. मात्र आता फेन्टानीलचा नशेसाठी वापर होऊ लागलाय. कारण फेन्टानीलच्या अवघ्या १ मिलीग्रॅमच्या सेवनातच जास्त नशा चढते. हुंगून चाखून किंवा इंजेक्शनद्वारे फेन्टानीची नशा केली जाते. फेन्टानीलला अमेरिका, युरोपमध्ये जास्त मागणी आहे. विशेष म्हणजे कोकेनच्या तुलनेत ते स्वस्त आहे. फेन्टानील तस्करी करणारं मोठं रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केलंय. पोलिस तपासात या रॅकेटनं एअर कार्गोनं थेट इटलीला ४०० किलो फेन्टालीन पाठवल्याचं उघड झालंय. यामागे हात असलेल्या गुजरातमधील एका बड्या उद्योजकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.  

फेन्टानील सगळ्यात खतरनाक असून जीवघेणा आहे. या ड्रग्जसनं जगभरात धुमाकूळ घातलाय. भारतातही  फेन्टानीलचा धोका वाढतोय. त्यामुळं यावर कठोर निर्बंध आणणं गरजेचं आहे, नाहीतर अख्खी तरुण पिढी बरबाद होऊ शकते.

Webtitle : marathi news mumbai 116 kg fenalyl seized by mumbai police 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

SCROLL FOR NEXT