उमेश काटे
अमळनेर (जळगाव) : सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिकणे सुरु रहावे यासाठी 'राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे'तर्फे ऑनलाईन पद्धतीने (Online education) विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) बहुतांश मुले घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या सर्व बाबीचा विचार करून दर शनिवारी आता ऑनलाईन पद्धतीने ‘शिकू आनंदे’ (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून (ता.३) या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी होणार असून घरबसल्या शारीरिक व्यायामही होणार आहे. (jalgaon-corona-lockdown-school-close-but-every-saturday-Exercise-lessons-at-home)
मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन केले जात आहे. शाळा बंद व लॉकडाऊनमुळे मात्र मुलांचे खेळणेच बंद झाले आहे. बहुतांश मुले ही सव्वा वर्षांपासून घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होत आहेत.
पहिली ते आठवीकरीता उपक्रम
भविष्यात त्या होऊ नये या पार्श्वभूमीवर परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने ‘शिकू आनंदे’ हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
संचालकांचे पत्र
‘शिकू आनंदे’ या उपक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी. असे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर (पुणे) यांनी काढले आहेत.
असा असेल उपक्रम
प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमध्ये https://youtu.be/pomXmGteUL4 या यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद, पेन्सिल, खोड रबर, वॉटर कलर, स्केच पेन, पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.