दोन माजी कृषी सभापतींमध्ये कांटे की टक्कर

दोन माजी कृषी सभापतींमध्ये कांटे की टक्कर; ही लढत वरीष्‍ठांसाठी ठरणार प्रतिष्‍ठेची
दोन माजी कृषी सभापतींमध्ये कांटे की टक्कर
Published On

धुळे : धुळे जिल्हा परीषदेच्या (Dhule Zilha parishad election) पंधरा जागा आणि पंचायत समितीच्या तीस जागांसाठी उमेदवारांचे चित्र स्पष्ट होवू लागले आहे. पाच जिल्ह्यात होत असलेल्या या निवडणूकांमध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी लढत कापडणे गटात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नुकतेच माजी झालेले कृषी सभापती बापू खलाणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे निकटवर्तीय तथा माजी कृषी सभापती किरण पाटील यांच्यात काट्याची लढत होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही काट्याची लढत वरीष्ठांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. (zilha-parishad-election-fight-will-be-about-prestige-for-seniors)

महाविकास आघाडीची उमेदवारी घोषीत

आरक्षणासाठी महत्वपुर्ण लढा देण्यासाठी राज्यात परीचित झालेले आणि निमडाळे- मेहरगाव गटात हरीत क्रांती घडवून आणणारे माजी कृषी सभापती किरण पाटील यांनी कापडणे गटात दंड थोपटले आहे. राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि राष्‍ट्रवादीचे सर्वच मंत्री, आमदार व खासदार यांच्या सोबत विकासासाठी संपर्क ठेवणारे म्हणून पाटील यांची ख्याती आहे. त्यांनी कापडणे गटात भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी कृषी सभापती यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मिळाली आहे.

दोन माजी कृषी सभापतींमध्ये कांटे की टक्कर
घर भाड्याने देणेही पडले महागात; ऑनलाइन व्‍यवहार केला अन्‌ लाखाचा चुना

भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

कापडणे गटात कम्युनिस्ट पक्षासह कॉग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करणारे म्हणून बापू खलाणे सर्वपरीचित आहे. मागील वर्षी ते बहुमताने निवडून आलेत. अन्‌ कृषी सभापती झालेत. जिल्ह्यात भाजपाचे अस्तित्व नसतांना, तेव्हापासून कापडणे गटात वर्चस्व निर्माण केले. जिल्ह्यात खर्‍या अर्थाने खलाणे यांनी भाजपा पोहचविली आहे. भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्यासमोर माजी सभापती पाटील कितपत आव्हान उभे करतात हे पाहणेही औत्सुक्यपुर्ण ठरणार आहे.

प्रा.माळी यांची उमेदवारीही निर्णायक

येथील प्रा. दिनकर माळी यांनीही उमेदवारी घोषीत केली आहे. खलाणे आणि पाटील यांच्यासमोर कितपत आव्हान उभे करतात. कोणत्या डावपेचांच्या माध्यमातून मार्ग काढतात, हे बघणेही महत्वपुर्ण असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे. दरम्यान राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत कापडणे गटात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com