घर भाड्याने देणेही पडले महागात; ऑनलाइन व्‍यवहार केला अन्‌ लाखाचा चुना

घर भाड्याने देणेही पडले महागात; ऑनलाइन व्‍यवहार केला अन्‌ लाखाचा चुना
ऑनलाइन
ऑनलाइनऑनलाइन
Published On

जळगाव : वेगवेगळ्या नंबरचा वापर करुन मयुर देवेंद्र चौधरी (रा. टेलीफोननगर) या तरुणाची ९५ हजार ९९६ रुपयांचा ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon-cyber-crime-amravati-home-rent-paytm-code-scan-online-fraud)

टेलिफोननगरातील रहिवासी मयुर चौधरी याचे अमरावती शहरात स्वत:चे घर आहे. त्यांनी ‘मॅजिकब्रिक्स’ या वेबसाईटवर नोकरदार कुटूंबास घर भाड्याने देण्याची ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यावरुन ५ जूनला रणदीप सिंग नाव सांगून एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मी भारतीय सैन्यदलात जम्मू काश्मिरला नोकरीला असून अमरावती युनीटला बदली झाली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे असे सांगितले. बोलणे झाल्यावर घरभाडे अॅडव्हान्स देतो; असे सांगत मयुर चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला, त्यानेही तो दिला.

ऑनलाइन
खळबळजनक! जैतपूर मध्ये १२ मोरांचा मृत्यू

क्‍युआर कोड स्‍कॅन करणे पडले महागात

मयुर चौधरी याला ११ जूनला रात्री आठ वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व १ रुपयाचा क्युआर कोड पाठवितोय, तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल असे, तो म्हणाला. त्यानुसार दोन रुपये मयुरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयुरला परत क्युआर कोड पाठविला. या क्यूआरकोडच्या सहाय्याने मयुरच्या पेटीएमवरुन १५ हजार ९९९ रुपये असे तीन वेळा व एक वेळा १८ हजार रुपये पाठविले. अशा पध्दतीने एकूण ९५ हजार ९९६ रुपये मयुरच्याच पेटीएमवरुन संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com