टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिटायर झालाय. त्याच्या निवृत्तीनंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडलाय, धोनीची नवी इनिंग कोणती असणार? बघुयात..
महेंद्रसिंग धोनी. धडाकेबाज फलंदाज. चपळ यष्टीरक्षक, चतूर कर्णधार, जिगरी यार. आणि दिलखुलास माणूस. अनेकांचा लाडका माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण आता धोनीची पुढची इनिंग कुठली असणार, याची जोरदार चर्चा रंगलेय. बघुयात काय आहेत, धोनीचे रिटायरमेंट प्लान्स.
धोनीच्या क्रिकेट करिअरची खासियतच ही होती, की तो कायम नव्या नव्या रुपात. नव्या नव्या युक्त्यांनी नवी आव्हान पेलून गेला. या रिटायरमेंट प्लान्ससोबतच धोनीला राजकारणात येण्याच्या ऑफरही येऊ लागल्यात. धोनीचं नेतृत्त्व कौशल्य अवघ्या देशाला ठाऊक आहेच. मात्र सार्वजनिक आयुष्यात थोडासा बुजरा वाटणारा धोनी राजकारणाची वाट सुद्धा धुंडाळतो का? तेही पाहावं लागेल.
पण माही जे काही करेल.. ते बेस्टच असेल. याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात शंका असण्याचं कारणच नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.