आकर्षक शरीरयष्टी कुणाला नको असते...अलीकडच्या तरूणाईत तर शरीर कमावण्याची जणू काही स्पर्धाच लागलीय. मग कुणी व्यायमासोबत पौष्टिक आहार घेतं तर कुणी स्टोरॉईड...पण हेच स्टेरॉईड मुंब्र्यातल्या एका तरूणाच्या जिवावर बेतलंय. नावेद जमील खान...वय जेमतेम 23 वर्ष...नावेदला चांगलं शरीर कमवायचं होतं. त्यासाठी तो नियमित व्यायामही करायचा...व्यायामसोबत स्टेरॉईडही ठरलेलंच..जी गोष्टी आपण शरीर कमावण्यासाठी घेतोय तीच आपल्या जिवावर बेतेल याची त्याला जराही कल्पना नव्हती. ठाण्यातल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरण्यासाठी नावेदनं स्टेरॉईडचं अतिप्रमाणात सेवन केलं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण मृत्यूनं त्याला मात दिली.
स्टेरॉईडमुळे हाडं कमजोर होऊन ठिसूळ होतात.रक्तबाब वाढणं, श्वसनाचा त्रास, मधुमेह, कमजोरी ही स्टेरॉईडच्या अतिवसेवनाची लक्ष्ण आहे. याशिवाय मोतीबिंदू, त्वचा पातळ होणं, शरीरावर अनावश्यक केस येणं हा देखील स्टेरॉईडच्या सेवनाचा दुष्परिणाम आहे.
स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे एका आईला आपल्या लेकाला गमवावं लागलंय..त्यामुळे शरीर कमावण्याच्या नादात कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका अशी आर्त साद या माऊलीनं घातलीय.
स्टेरॉईडनं बळी गेल्याची ही या महिन्यातली दुसरी घटना आहे. त्यामुळे केवळ शरीर कमावण्याच्या मोहापाई स्वत:चा जीव धोक्यात घालू नका. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी त्याचा अतिवापर हा घातकच असतो...
WebTittle :: VIDEO | Is the body earning or losing?
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.