akola
akola  
एक्स्क्लुझिव्ह

शिक्के मारणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची कारवाई ! वाचा काय आहे प्रकरण 

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकोला : अकोल्यातील Akola तेल्हारा Telhara येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचे पोते देताना त्या पोत्यांवर 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल' असे अनधिकृत शिक्के मारून शेतकर्‍याना विकले होते. Suspension action on agricultural service center Read what is the case

हे वृत्त 'साम टिव्हीने' 3 जून रोजी दाखविले होते. त्यांनतर यामध्ये दुसऱ्या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.कांताप्पा खोत यांनी चौकशीचे आदेश देऊन 14 जून रोजी त्यांच्याकडे सुनावणी ठेवली. या सूनवणीनंतर कृषी अधीक्षक यांनी तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र हे निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच इतरही तीन कृषी सेवा केंद्रावर निलंबन आणि एका केंद्राचा Licence परवाना रद्द Cancell केला आहे. 

तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने अजबच प्रकार केला आहे. या कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना Farmers सोयाबीन बियाणे देताना त्या बिलावर Bill अनधिकृतपणे शिक्के Stamp मारले. 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. 

हे देखील पहा -

कृषी सेवा केंद्र चालक अशाप्रकारे शिक्के मारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार यामधून दिसून येत आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये 'साम टीव्ही' Saam TV  चॅनलने 3 जून रोजी यासंदर्भात वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी साम टीव्हीच्या वृत्ताची दखल घेवून याप्रकरणी तेल्हारा तालुका कृषी अधिकारी यांना चौकशीचे आदेश 4 जून रोजी दिले.

तसेच यातील चौकशी अहवाल आणि संबंधित कृषी सेवा केंद्र संचालक याची 14 जून रोजी त्यांच्या समक्ष सुनावणी ठेवली. या सूनवणीनंतर जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.कांताप्पा खोत यांनी तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्राला दोषी ठरविले. तसेच हे कृषी सेवा केंद्र महिन्याभरासाठी निलंबित Suspend केले आहे. 

यासोबतच बियाण्यांची लिंचिंग केल्याप्रकरणी तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्राचा Agricultural Service Center परवाना रद्द केला आहे. कानशिवणी येथील कृषी सेवा केंद्र निलंबित केले आहे. यासोबतच इतरही ठिकाणचे दोन कृषी सेवा केंद्र निलंबित केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 28 उमेदवारांचे अर्ज वैध

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT