Senior citizens asking questions about Covid Vaccination to People representatives
Senior citizens asking questions about Covid Vaccination to People representatives  
एक्स्क्लुझिव्ह

ज्याप्रमाणे नेते मतदानासाठी जेष्ठांना वाहन घेवून येतात त्याच प्रमाणे आता....

दिनेस पिसाट

गोंदिया: ओह... लोक प्रतिनिधींनो; आता आमचे ही ऐका.... आता मतदानाला Election नेता ना तस लसीकरणाला न्या ! काय ऐकत आहात  हे खरे आहे. ही मागणी आहे. गोंदिया Gondia जिल्हातील सर्वच जेष्ठ नागरिकांची.... मतदान आल तर आम्ही आठवतो, आमच्या मतासाठी हात पाय जोड़ता, मग आता लसीकरण Vaccination केन्द्रासाठी आम्हाला वणवण का फिरवता ? असा संतप्त सवाल येथील जेष्ठ नागरिक विचारत आहेत. Senior citizens asking questions about Covid Vaccination to People representatives 

एकीकडे राज्यात  State कोरोना Corona लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे राज्यभरात जिवंत चित्र आहे. मात्र गोंदियात नागरीक वेळेवर लसीकरणासाठी न पोहचल्याने तब्बल 6057 लसी वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघड़ झाली आहे. तेव्हा आता गोंदियातील जेष्ठ नागरीकांकडून नवीनच मागणी समोर आली आहे. ज्याप्रमाणे नेते मतदानासाठी जेष्ठांना वाहन घेवून घरपोच येतात अन मतदान केंद्रावर घेवून जातात, त्याचप्रमाणे आता कोरोना काळात लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी वाहन घेवून घरी यावं अन लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर घेवून जायला हव. त्यामुळे वेळेत लस घेता येईल आणि लस वाया जाण्याचे प्रमान ही कमी होईल. 

 हे देखील पहा - 

निवडणुक कोणतीही असो मात्र गोंदिया जिल्ह्यात कधी शंभर टक्के मतदान झाल्याच आपण पाहीलं नाही. मात्र आता कोरोना लसीकरणाच्या बाबतीतसुद्धा तसंच घडत की काय असेच वाटत आहे. कोरोनाने गोंदिया जिल्ह्यात अनेक नागरीकांचा बळी घेतला. या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी टाळेबंदीसह लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसिकरणाचे उद्धिष्ठ पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधिनी  पुढे येऊन वृद्धासह सर्व लोकांना वेळेवर लसीकरणाला पोहचते करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. Senior citizens asking questions about Covid Vaccination to People representatives 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने Second Wave थैमान घातल्यानंतर तिसरी लाट येण्याचे संकेत आधीच सरकारने दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.  पहिल्यांदा लसीकरण घेतलेल्या लोकांनी  दुसरा डोसदेखील घेणे गरजेचे आहे. निवडणुकामध्ये ज्या प्रमाणे लोकप्रतिनिधी People representatives लोकांना मतदान केंद्रांवर घेऊन जातात मतदान करायला त्याच प्रमाणे कोरोनाची लस लावायला सुद्धा लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. 

तर एकीकडे प्रशासनामार्फत गावोगावी जाऊन नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे समज  नागरिकांमध्ये असल्याने, लसीकरण केंद्रांवर नागरिक येत नाहीत. त्यामुळे आता लोप्रतिनिधींनी आपआपल्या परीसरात जावून नागरीकांना मतदान केंद्राप्रमाणे लसीकरण केंद्रावर घेवून जाण्याची गरज आहे. जेनेकरुण कोरोनाच्या महासंकटात आपला विजय निच्छित होईल. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengal School Jobs Scam: लोकांचा विश्वासच उडेल! शिक्षक भरती घोटाळ्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची तिखट टिप्पणी

Unseasonal Rain : चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

Mumbai Local : ठाकुर्ली- कल्याण दरम्यान पुन्हा अपघात; लोकलची धडक लागून एकाचा मृत्यू

Live Breaking News : धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT