एक्स्क्लुझिव्ह

रक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे!

PTI

वैद्यकशास्त्राच्या भाषेत याला लार्ज स्ट्युडो अन्युरिझम म्हणतात. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया अवघ्या 44 मिनिटांत करण्याचे आव्हान येथील डॉक्‍टरांनी स्वीकारले आणि त्या युवकाला नवजीवन दिले. कॉर्डिओथोरॅसिक व व्हॅस्कुलर सर्जन डॉ. समित पाठक यांनी ही शस्त्रक्रिया सहकाऱ्यांच्या साथीने यशस्वी केली.

वर्षभरापूर्वी भरत छातीचे दुखणे घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला होता. हृदयातून रक्त वाहत होते. परंतु, याची जाणीव भरतला दीड वर्षापासून झाली नाही. मात्र, मुख्य रक्तवाहिनीजवळ रक्ताची गाठ तयार झाली. यामुळे हृदयाच्या सभोवताल सूज आली. या रक्ताच्या गाठीमुळे छातीचे मुख्य हाड ठिसूळ होत गेले. काही महिन्यांत ही रक्ताची गाठ फुटली असती किंवा हृदयावर शल्यक्रिया सुरू असतानाही ही गाठ फुटली असती तर भरतचे प्राण वाचविणे अशक्‍य होते. हे लक्षात आल्यामुळे भरतच्या शरीरातील संपूर्ण रक्त काढणे आवश्‍यक होते. 

शरीराबाहेर तयार केले रक्ताचे चेंबर 
भरतच्या शरीरारातील रक्ताचा थेंब अन्‌ थेब बाहेर काढला. शरीराबाहेर जणू रक्ताचे चेंबर तयार केले. शस्त्रक्रिया करताना हृदयाची गती थांबवली. शस्त्रक्रियेदरम्यान शरीराचे तापमान 36 डिग्री सेल्सियसवरून 18 डिग्रीपर्यंत कमी केल्यामुळे शरीराला ऑक्‍सिजनची गरज भासली नाही. रक्ताभिसरण थांबवून तापमान नियंत्रित ठेवले तर हृदय आकुंचन पावते. मात्र त्यासाठी अवघी 35 मिनिटे असतात. 35 मिनिटांनंतर मात्र शरीराचे तापमान पूर्ववत आणणे आवश्‍यक असते. रक्ताभिसरण बंद करण्याचा कालावधी मिळून 44 मिनिटे रक्त आणि ऑक्‍सिजन नव्हते. शस्त्रक्रिया यशस्वी होताच शरीराचे तापमान पूर्ववत करण्यात आले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत उडी मारत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT