एक्स्क्लुझिव्ह

आणखी एका रामबाण लसीची चाचणी यशस्वी

साम टीव्ही

कोरोनावरील आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी झालीय. अमेरिकेतल्या एका औषध निर्मिती कंपनीनं ही लस गुणकारी असल्याचा दावा केलाय.

जगभरात कोरोनाच्या संसर्गानं अक्षरशः थैमान घातलंय. कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता एक चांगली बातमी समोर आलीय. कोरोनावर रामबाण ठरेल अशी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोव्हिओनं केलाय. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरल्याचा दावाही या कंपनीनं केलाय. 

इनोव्हिओ कंपनीने आयएनओ-४८०० नावाची लस विकसित केलीय. ४० जणांवर या लसीची चाचणी करण्यात आली. ही चाचणी ९४ टक्के यशस्वी झाली, असं या कंपनीचं म्हणणं आहे.  क्लिनिकल चाचणी दरम्यान अमेरिकेत १८ ते ५० या वयोगटातील ४० लोकांना लस देण्यात आली होती. या ४० जणांना चार आठवड्यात दोनदा ही लस देण्यात आली. त्यानंतर या लसीमुळे सर्वांच्याच शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तसंच, या चाचणी दरम्यान, कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याचंही कंपनीनं म्हटलंय. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली चाचणी लवकरच सुरू होणारंय. 

जगभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी १२० हून अधिकजण प्रयत्नशील आहेत. यामध्ये १३ लस या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात दाखल झाल्यात. यामध्ये चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लसींची संख्या अधिक आहे. सध्या चीनमध्ये ५, ब्रिटनमध्ये २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहे. 

तीन टप्प्यात मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर संबंधित देशाच्या औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी ही लस पाठवली जाते. त्यानंतर या लसीशी संबंधित सर्व बाबी तपासून पाहिल्या जातात. या लसीचा मानवाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो का हे तपासून पाहिलं जातं. त्यानंतरच या लसीला मान्यता दिली जाते. या प्रक्रियेत साधारणपणे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणारंयत. त्यामुळे लस येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT