yass cyclone
yass cyclone 
एक्स्क्लुझिव्ह

Cyclone Yasa: उद्या उत्तर प्रदेशातील ''या'' जिल्हयांना फटका बसण्याची शक्यता

अक्षय कस्पटे

तोक्ते चक्रीवादळानंतर (Tauktae Cyclone) आणखी एक वादळाचा देशाला फटका बसणार आहे. शनिवारी, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामधील (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र गंभीर वादळामध्ये रूपांतरित होऊ शकते. त्याचबरोबर, 26 मे रोजी पश्चिम बंगाल (West Bengal), ओडिशाचा उत्तर भाग आणि बांगलादेशच्या किनाऱ्याकडे जाऊ शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगाल आणि ओडिशाला यास वादळाचा जास्त त्रास होऊ शकतो. तथापि, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आधीच तयारी सुरू आहे. बंगालच्या उपसागरात उसळणाऱ्या वादळाच्या परिणामामुळे उत्तर प्रदेशातील बस्ती, सिद्धार्थनगर आणि संतकबीरनगर या तीन जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Cyclone Yasa: 3 districts in Uttar Pradesh are likely to be hit tomorrow)

हे देखील पाहा

माहिती देताना हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले की 26 ते 28 मे दरम्यान बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बस्ती, सिद्धार्थनगर आणि संतकबीरनगर या तीन जिल्ह्यांमध्ये हवेचा दाब कमी असल्याने या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आंबा, लीची, बेरी, पेरू इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

येत्या 12 तासात 'यास' गंभीर रुप धारण करेल

'यास' चक्रीवादळ उत्तर-वायव्येकडे जात पुढच्या 12 तासांत गंभीर रूप धारण करेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने आज दिली. हवामान खात्याने असे निवेदन जारी केले की ''चक्रीवादळ वायव्य दिशेकडे जाईल आणि त्यानंतर उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ जाईल. बुधवारी सकाळी उत्तर-पश्चिम उपसागर आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात वेगवान होईल. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास चक्रीवादळ उत्तर ओडिशा-पश्‍चिम बंगालच्या पारदिप आणि सागर बेटांना ओलांडणे अपेक्षित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री आणि अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल यांच्याशी चर्चा केली.  अमित शहांनी ''कोविड -19 मधील सर्व रुग्णालये, लॅब, लसीच्या शीत साखळी आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी पॉवर बॅकअप तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT