nagpur corona update
nagpur corona update 
एक्स्क्लुझिव्ह

नागपुरात 11 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

संजय डाफ

नागपूर - नागपूरमध्ये सध्या कोरोनाचा फैलाव पाहायला मिळतोय. गेल्या अकरा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून 24 तासात 63 नव्या रुग्णांची भर पडलीय. या घटनेने नागपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय.

पार्वतीनगरमधील एका बावीस वर्षीय तरुणांचा मृत्यूनंतर रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, नागपूरमधील कोरोना बळीचा आकडा 3वर गेला आहे. २२ वर्षीय युवक मंगळवारी मेडिकलच्या अपघात विभागात, कान दुखत असल्याने दाखल झाला होता. तो स्किझोफ्रेनियानेसुद्धा ग्रस्त होता. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

नागपुरात रुग्णांची संख्या आता २२५ वर पोहचलीय. धक्कादायक म्हणजे, एक मृत आणि तीन रुग्ण हे ‘रेड झोन’बाहेरील वसाहतीतील म्हणजे पार्वतीनगर, मोठा ताजबाग, जरीपटका आणि गणेशपेठ या नव्या वसाहतीतील आहेत. यामुळे येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पुण्यात 24 तासांत 99 रुग्ण वाढले

पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 99 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा 2 हजार 319 वर पोहोचला आहे तर एकूण 127 जणांचा बळी गेला आहे. आता पर्यंत 665 जण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 

राज्याची रुग्णसंख्या 17 हजाराच्या दिशेने

महाराष्ट्रात काल एका दिवसात 1 हजार 233 नवीन रुग्णांचं निदान झालंय. त्यामुळे राज्याची एकूण आकडेवारी 16 हजार 758 वर पोहचलीय. राज्यात बुधवारी एका दिवसात एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे काल तब्बल 275 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3094 कोरोनाबाधित रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेलेत.
तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत 769 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत 10 हजार 714 कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत 25 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

cororna cases doubled in magpur maharashtra marathi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanaji Sawant |तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांचं केलं "असं" वर्गीकरण!

Balasaheb Thorat News | 13 पैकी एखाद जागेवर महायुतीचं खात उघडणार?

Vastu Tips: स्वयंपाकघरात 'या' वस्तु ठेवल्यास होईल घरातील वातावरण नकारात्मक

Couple Fight : 'निघून जा, माझ्या आयुष्यात येऊ नको'; गर्लफ्रेंडची सटकली, मेट्रोमध्येच बॉयफ्रेंडला कानफटवलं, Video

आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांचा ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT