एक्स्क्लुझिव्ह

सावधान! कोरोना आणि डेंग्युची युती...कोरोनामुळे अचानक प्लेटलेट्सची संख्या घटतेय

साम टीव्ही

अनेक महिन्यांपासून कोरोना आपलं रुप बदलतोय. आता त्यात आणखी एका नव्या लक्षणाची भर पडलीय. कोणतं आहे हे लक्षण. पाहुयात एक रिपोर्ट

अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर पडतीय. त्यात आता चिंता वाढवणारं एक लक्षण दिसून आलंय. कोरोना व्हायरसमुळे प्लेटलेट्सची संख्या अचानक घटताना दिसून आलीय. डेंग्युच्या रुग्णांमध्ये अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे व्यक्तीच्या प्लेटलेट्स अचानक 20 हजारांपेक्षा कमी होतात. 

  • कोरोनामुळे व्यक्तीच्या शरिरातील प्लेटलेट्सची संख्या 20 हजारांहून खाली जाते. 
  • डेंग्यु आजारात अशा पद्धतीनं प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होते.
  • कोरोना व्हायरस व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो.
  • प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मोनोसाईड आणि मायकरोफेज पेशींवर परिणाम होतो. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या लक्षणीय पद्धतीनं घटते.

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असतानाच मुंबईसह महाराष्ट्रात मलेरियानंही डोके वर काढलंय. कोरोनाची लक्षणे मलेरियासारखीच आहेत, आता त्यात डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्सची संख्या घटणं या लक्षणाचीही भर पडलीय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची आव्हानं वाढलीयेत.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gangadhar Gade Death : चळवळीचा लढाऊ पँथर हरपला! माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT