एक्स्क्लुझिव्ह

वाचा, मराठा आरक्षण सुनावणीदरम्या सर्वोच्च न्यायलयात आज नेमकं काय घडलं?

साम टीव्ही

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय. मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय. बघुयात आज सर्वोच्च न्यायलयात नेमकं काय घडलंय.

 सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  तसंच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेय. आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेलं घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे.

तर आज कोर्टात सुनावणीदरम्यान काय युक्तिवाद झाला पाहा - सुनावणीदरम्यान काय झालं ? 

केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणाचं प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे गेलंय. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी त्यापेक्षा मोठं खंडपीठ हवं, अशी बाजू रोहतगींनी मांडली. मराठा आरक्षणाचा निर्णय निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालाआधारे घेण्यात आला. मराठा आरक्षण आणि आर्थिक आरक्षणाचं प्रकरण एकमेकात गुंतलंय. त्यामुळे हे प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे जाण्याची गरज आहे, असा युक्तिवाद रोहतगींनी केला.

तर इंद्रा साहनी प्रकरणात १९३१ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील ८५ टक्के लोकसंख्या मागास प्रवर्गातील आहे. त्यामुळे इंद्रा साहनी प्रकरणाचा अडथळा अधिक आरक्षण देण्यासाठी येत नाही, असं सिब्बल यांनी यावेळी म्हटलं.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे आणि हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केल्यातआता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून  ठरणार आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

SCROLL FOR NEXT