Zubeen Garg Last Wish Saam tv
मनोरंजन बातम्या

Zubeen Garg: जुबिन गर्ग यांची शेवटची इच्छा चाहत्यांनी केली पूर्ण, VIDEO व्हायरल

Zubeen Garg Last Wish: आसामचे लोकप्रिय गायक आणि संगीतकार जुबिन गर्ग यांचे 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.

Shruti Vilas Kadam

Zubeen Garg Last Wish: आसामचे लोकप्रिय गायक, संगीतकार आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले जुबिन गर्ग यांचे 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ आसाम नव्हे तर संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली. जुबिन गर्ग हे ‘या अली’ या हिंदी गाण्यामुळे देशभरात परिचित झाले, मात्र आसामी आणि ईशान्य भारतातील लोकांसाठी ते एक सांस्कृतिक प्रतीक होते.

त्यांच्या मृत्यूनंतर एक भावनिक दृश्य घडले. जुबिन गर्ग यांची शेवटची इच्छा होती की, त्यांच्या निधनानंतर आसामभर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे आवडते गाणे ‘मायाबिनी रतीर बुकुट’ एकत्र येऊन गायले पाहिजे. त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानाबाहेर हजारो चाहते जमा झाले. त्यांनी एकसुरात हे गाणे गायले आणि डोळ्यात आलेल्या अश्रूंसह जुबिन यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जुबिन गर्ग यांच्या निधनामुळे आसामच्या रस्त्यांवर शोकमग्न वातावरण होते. त्यांच्या चाहत्यांनी सांगितले की, जुबिन हे फक्त गायक नव्हते, तर ते आसामच्या संस्कृतीचे आणि ओळखीचे प्रतीक होते. त्यांच्या गाण्यांमध्ये आसामच्या भूमीचा सुगंध होता. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आवडत्या गाण्याने आसाम गुंजून गेला.

त्यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांनी या प्रसंगी एक आवाहन केले आहे. जुबिन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मॅनेजर सिद्धार्थ सरमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गरिमा यांनी चाहत्यांना विनंती केली की, अशा गोष्टी टाळून सर्व काही शांततेत होऊ द्या, कारण जुबिन यांना तणाव किंवा वाद नको होते.

जुबिन गर्ग यांनी आपल्या कलाविश्वातील प्रवासात हिंदी, आसामी, बंगाली, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी संगीत दिग्दर्शन, अभिनय, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांत काम केले. त्यांच्या निधनामुळे ईशान्य भारतातील एक मोठा सांस्कृतिक वारसा हरपला आहे. त्यांच्या चाहत्यांनी मात्र त्यांच्या आठवणी कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका; १८ सराईत गुन्हेगार तडीपार, नावे आली समोर

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

IPS अधिकारी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, तपास अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

SCROLL FOR NEXT