Amruta Deshmukh Got Best Actress Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Deshmukh: निव्वळ योगायोग! अमृता देशमुखला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, फोटो पोस्ट करत म्हणाली...

Amruta Deshmukh Got Best Actress Award: मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

Priya More

Zee Natya Gaurav 2024:

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा (Zee Natya Gaurav 2024) नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. अशामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुखला (Amruta Deshmukh) व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

अमृता देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याची गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. अमृताला ‘नियम व अटी लागू’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अमृताने तिला मिळालेल्या ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले. या पोस्टच्या माध्यमातून अमृताने पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या. तिच्या या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'झी नाट्य गौरव हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याशा टीव्हीवर उत्साहाने बघायचे... आणि स्वप्नंसुद्धा बघायचे..तिथे असण्याची..कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं...! आता जेव्हा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक'ची ट्रॉफी माझ्या हातात बघते... तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही असं वाटत...ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव "नियम व अटी लागू" साठी त्यांना सुचवणारी कविताताई...ह्यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा "निव्वळ योगायोग"! खरं सांगायचं तर हे दोघे स्टेजवर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की "छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाही"च" येत!" आणि म्हणूनच वाटतं.. “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?”'

दरम्यान, अभिनेत्री अमृता देशमुखने मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. अमृता देशमुख ‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली. या मालिकांमुळेच तिला खरी ओळख मिळाली. अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकामध्ये अमृतासोबत संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे हे कलाकार देखील काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT