लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप
अवघ्या वर्षभरातच मालिका गाशा गुंडाळणार
मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दुपारपासून मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळते. मालिका प्रेक्षकांना आपल्या घरातल्याच वाटतात. मात्र जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा प्रेक्षक काहीसे नाराज होतात. अशात आताही आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
झी मराठी वाहिनीवर याच वर्षी सुरू झालेली मालिका 'शुभ श्रावणी' लवकर संपणार असल्याचे बोले जात आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री वल्लरी विराजने केलेल्या एक पोस्टनंतर ही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 'शुभ श्रावणी' मालिकेत वल्लरी विराजसोबत अभिनेता सुमित पाटील झळकला आहे. श्रावणी-शुभंकर या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. जानेवारी २०२६ मध्ये सुरू झालेली 'शुभ श्रावणी' मालिका संपणार असल्याचे बोले जात आहे.
वल्लरी विराजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिचा मालिकेचा सेटवरील श्रावणीच्या लूकमधील फोटो पाहायला मिळत आहे. त्यावर फोटोवर तिने लिहिलं की, "श्रावणी म्हणून शेवटची तयार झालीय...तुम्ही त्यांच्यासाठी कितीही तयारी केली तरीही गुडबाय कठीण असते..." अभिनेत्रीच्या पोस्टने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून काही नेटकरी म्हणताय की, मालिका संपणार तर काही म्हणत आहे की, मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज निरोप घेणार, त्यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. अवघ्या सात महिन्यात मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र अद्याप मालिका संपणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
'शुभ श्रावणी' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ६:३० वाजता प्रसारित होते. या मालिकेत वल्लरी विराज, सुमित पाटील यांच्यासोबत लोकेश गुप्ते, आसावरी जोशी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.