लक्ष्मीनिवास Lakshmi Niwas 
मनोरंजन बातम्या

Lakshmi Niwas: भावना सिद्धूला जेलमधून सोडवू शकेल का? लक्ष्मी निवास मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

Lakshmi Niwas Marathi Serial: झी मराठीच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून भावना–सिद्धूच्या नात्यातील भावनिक क्षण, सिद्धूचा तुरुंगातील संघर्ष आणि श्रीकांतच्या अपघातामागच्या खऱ्या गुन्हेगाराचा उल्लेख या सर्वामुळे कथा नव्या वळणावर पोहोचली आहे.

Shruti Vilas Kadam

लक्ष्मी निवास मालिकेत नवा ट्विस्ट.

भावना सिद्धूला जेलमधून सोडवू शकेल का?

अपघाताचं सत्य पोलिसांसमोर येईल का?

Lakshmi Niwas: ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रोमोमध्ये भावना आणि सिद्धूराज यांच्यातील नाते आणि संघर्ष यांचे दिसून येतो. सध्या मालिकेत सिद्धू अपघाताची जबाबदारी स्वीकारून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या घटनाक्रमामुळे कथा नवे वळण घेत आहे.

प्रोमोची सुरुवात भावना जेलमध्ये सिद्धूला भेटायला जाण्यापासून होते. सिद्धूला पाहताच ती रडू लागते. जरी दोघांमध्ये अंतर वाढले असले, तरी त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास अजूनही कायम असल्याचे या संवादातून स्पष्ट होते. सिद्धू भावनेला धीर देत म्हणतो की, “आपल्यामधील या जाळ्या लवकरच कायमच्या दूर होतील.” त्याच्या या शब्दांनी दोघांमधील नाते अजूनही मजबूत असल्याचे जाणवते.

या प्रोमोमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे श्रीकांतच्या अपघातामागील खरी व्यक्ती कोण होती, याबद्दलचा संकेत. सिद्धू भावनेला सांगतो की, “श्रीकांतचा गुन्हेगार सापडलाय.” म्हणजेच सिद्धूने कबुली दिलेला गुन्हा त्याचा नसून कोणी दुसरेच दोषी असू शकते, असा इशारा मिळतो. त्यामुळे कथा आणखी रंजक बनते. पुढचे काही भाग या अपघाताचे सत्य, गुन्हेगार कोण आणि सिद्धू निर्दोष असल्याचे कसे सिद्ध होईल याभोवती फिरणार असल्याची शक्यता आहे.

भावना सिद्धूला यातून बाहेर काढू शकेल का, त्यांचे नाते पुन्हा पूर्ववत होईल का, आणि अपघाताचे सत्य संपूर्ण कुटुंबासमोर येईल का हे प्रश्न सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट, नात्यांमध्ये येणारे चढउतार यामुळे प्रेक्षक मालिकेशी जोडले गेले आहेत. पुढच्या भागांमध्ये भावना–सिद्धूचे नाते कोणत्या दिशेने जातील आणि अपघातामागचे रहस्य कधी उघड होईल, याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

आज चंद्र सिंह राशीत; कोणत्या राशींना मिळणार यश आणि कोणासाठी आहे ‘लकी डे’?

Maharashtra politics : मुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर कौतुक, एकनाथ शिंदेंची भविष्यावर नजर? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT