Shruti Vilas Kadam
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक असल्याने हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
थंडीमध्ये त्वचा कोरडी होते, पण स्ट्रॉबेरीतील अँटिऑक्सिडंट्स त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेट ठेवतात.
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीतील पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
फायबरमुळे पोट साफ राहते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
स्ट्रॉबेरीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन C, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट्समुळे केस मजबूत होतात आणि त्वचेवरील सूज, पिंपल्स कमी होतात.