Devmanus Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devmanus: 'माझ्यावर चान्स मारतोयस…; देवमाणूसमध्ये सबसे कातिल गौतमी पाटीलची एन्ट्री, मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिका “देवमाणूस – मधला अध्याय” मध्ये आता एक नवा ट्विस्ट उलगडत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये लावणी स्टार गौतमी पाटीलची एन्ट्री झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिका “देवमाणूस – मधला अध्याय” मध्ये आता एक नवा ट्विस्ट उलगडत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये लावणी स्टार गौतमी पाटीलची एंट्री झाली आहे. सोशल मीडियावर ‘सबसे कातिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लावणी स्टारने आपल्या ठसकेबाज लावणी आणि ठसठशीत उपस्थितीने प्रचंड चर्चेचा वावर केला आहे. तिच्या या भूमिकेने मालिकेला एक नवीन उर्जा मिळवून दिली आहे आणि प्रेक्षक उत्सुकतेने अगामी भाग पाहत आहेत.

प्रोमोमध्ये विशेषतः गौतमीचा ‘ब्लाउज सीन’ आणि डॉ. अजितकुमार देव (किरण गायकवाड यांनी साकारलेले) यांच्यातील संवाद प्रेक्षकांना आवडला आहे. या दृश्यांमुळे सोशल मीडियावर आणखी चर्चा वाढली असून, अनेकांनी “माझ्यावर चान्स मारतोय…” गौतमीच्या संवादांचे विशेष कौतुक केले आहे.

गौतमीची एन्ट्री टीआरपी वाढवण्यासाठीचे पाऊल म्हणून काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांनी तिच्या मालिकेत घेतलेल्या प्रवेशाला ट्रोल केले असून, त्यांनी या निर्णयाला टीआरपीसाठी करण्यात आलेली “गायब स्टंट” मानले आह. यामुळे मालिकेच्या कथेवर आणि निर्मितीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

देवमाणूस” मालिकेचे पहिल्या दोन सीझनना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिला सीझन ३१ ऑगस्ट २०२० पासून सुरु झाला आणि दुसरा सीझन १० सप्टेंबर २०२२ रोजी संपला. आता या तिसऱ्या सीझनमध्ये गौतमी सारख्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती मालिका अधिक उत्तम बनवेल.पण, आता प्रश्न आहे की ती डॉक्टर देवला फसवेल का, की तोच तिला धडा शिकवील? हाच अपेक्षित थरकापाचा भाग राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT