Fu Bai Fu Show Coming Soon  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fu Bai Fu: झी मराठीवर होणार मनोरंजनाचा डबल धमाका; 'या' कार्यक्रमाचा येणार सिक्वेल

झी मराठीवरील 'फू बाई फू' कार्यक्रमाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते आता हा कार्यक्रमाचा पुढील सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: झी मराठीवरील 'फू बाई फू' हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येत आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला बरेच कॉमेडीस्टार दिले आहेत. या कार्यक्रमातून मनोरंजनाचे बालकडू घेत सध्या महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन करत आहेत. अनेक कार्यक्रम मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करुन जातात. त्यातच काही मालिकांचे रिमेक येणार आहेत तर काहींचे सिक्वेल येणार आहेत. यंदा झी मराठीने प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीच कमी न भासवण्याचे ठरवले आहे. (Marathi Entertainment News) (Marathi Actress)

टीव्हीवर बऱ्याच मालिका, रिअॅलिटी शो, डान्स शो, कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही कार्यक्रम असे वाटतात की कधी संपूच नये. अशाच एका कार्यक्रमाने ९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा वसा हाती घेतला होता. त्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. 'फू बाई फू' कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाचे तब्बल १४ भाग प्रदर्शित झाले होते. आता पुन्हा एकदा तब्बल ९ वर्षांनंतर मनोरंजनाचा धमाका होणार आहे.

या कार्यक्रमात काही जुने हुरहुन्नरी कलाकारांचा वावर पहायला मिळणार असून जोडीला नवे कलाकारही दिसणार आहेत. कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी असणाऱ्या वैदेही परशुरामीकडे देण्यात आली असून कार्यक्रमातील परीक्षणाची जबाबदारी जेष्ठ अभिनेत्री, कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देण्यासाठी कोण कोण येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहेत. "फु बाई फू" ३ ही मालिका नोव्हेंबर महिन्यात गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त 'झी मराठीवर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT