Ashok Saraf Jeevan Gaurav Award Special Post Nivedita Saraf  Instagram
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: अशोक मामांना जीवनगौरव मिळाल्यावर निवेदिता सराफ यांच्या भावना अनावर, प्रेक्षकांचे मानले आभार

‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’ या सोहळ्यामध्ये अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या निमित्त पत्नी आणि मराठी टेलिव्हिजनवरील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Ashok Saraf Jeevan Gaurav Award: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यावर्षी वयाची पंच्याहत्तरीपूर्ण करीत आहे. सोबतच मराठी सिनेसृष्टीतील कारकिर्दिचीही पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतंच ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’सोहळा पार पडला. यामध्ये दरवर्षी एका ज्येष्ठ अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या निमित्त पत्नी आणि मराठी टेलिव्हिजनवरील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’या वाक्यावर ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’ या पुरस्कार सोहळ्याची चर्चा होत होती. अनेक डान्स शोने देखील कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढवली आहे, अशातच अशोक सराफ यांचा सन्मान केल्यानंतर सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याची चांगलीच चर्चा होत आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर कालच अशोक सराफ यांचा सन्मान करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

त्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित झी मराठीचे आभार मानले.

निवेदिता सराफ सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणतात, “मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल” असे कॅप्शन निवेदिता सराफ यांनी या फोटोला दिले आहे.

निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेता सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, उमेश कामत, श्रेयस तळपदे ही कलाकार मंडळी बसून अशोक सराफ यांना हा पुरस्कार देताना दिसत आहेत.

अशोक सराफ यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चमक दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT