Zarine Khan Funeral SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zarine Khan Funeral : जरीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईला अखेरचा निरोप देताना लेक ढसाढसा रडला, पाहा VIDEO

Zayed Khan Crying Video : प्रसिद्ध अभिनेता झायेद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तेव्हा आईला अखेरचा निरोप देताना झायेद खान ढसाढसा रडला.

Shreya Maskar

अभिनेता झायेद खानची आई जरीन खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वयाच्या 81 वर्ष जरीन खान यांनी अखेरचा श्वास घेतला.

आईला अखेरचा निरोप देताना मुलगा (झायेद खान) ढसाढसा रडला.

मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेते संजय खान यांची पत्नी जरीन खान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 81 वर्ष जरीन खान यांनी अखेरचा श्वास घेतला. जरीन खान यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार येथे पाहायला मिळाले. जरीन खान यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जरीन खान यांची मुलं (सुजैन खान, सिमोन खान, फराह अली खान आणि झायेद खान ) भावुक झाली आहेत.

सध्या सोशल मीडियावर जरीन खान यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता झायेद खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात आईला अखेरचा निरोप देताना झायेद खान ढसाढसा रडताना दिसत आहे. तो खूप भावुक झाला होता. येथे खान कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. हृतिक रोशन, जॅकी श्रॉफ, बॉबी देओल आणि इतरांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जरीन खान यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जरीन खान यांनी शुक्रवारी (7 नोव्हेंबर 2025) ला मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जरीन खान गेल्याकाही काळापासून आजारी होत्या. जरीन खान या उत्तम अभिनेत्री होत्या. जरीन खान यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे 'तेरे घर के सामने' आणि 'एक फूल दो माली' सिनेमे खूप गाजले.

अभिनय क्षेत्रानंतर त्यांनी इंटीरियर डिझायनर म्हणून प्रसिद्धी मिळाली. उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. जरीन खान वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा संजय खान यांना भेटली. त्यांनी 1966ला लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अशोक खरात हा बाईलवेडा; मनसेचा नेता संतापला | VIDEO

होर्मुझची सामुद्रधुनी खुली,पण...; घोषणा करताना इराणनं ठेवली अट; भारताच्या जहाजांना परवानगी असणार? अनेक देशांचं टेन्शन वाढलं

Ashok Kharat: विरोधी पक्षातील नेतेही अशोक खरातकडे जायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उच्चस्तरीय बैठक सुरू; जागतिक घडामोडींना वेग|VIDEO

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये टॉवर लाईनवरून शेतकऱ्यांचा संताप; आत्मदहनाचा इशारा

SCROLL FOR NEXT