Shah Rukh Khan Did Not Like Honey Singh's Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yo Yo Honey Singh On Lungi Dance: ‘लुंगी डान्स’ शाहरूखला आवडला नाही?; खुद्द हनी सिंगनेच केला सर्वात मोठा खुलासा...

Story Behind Lungi Dance Song: शाहरूखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ हे गाणं चांगलंच प्रसिद्धीझोतात होतं. हे गाणं शाहरूखला आवडलं नसल्याचं हनी सिंगने सांगितलं...

Chetan Bodke

Shah Rukh Khan Did Not Like Honey Singh's Song: बॉलिवूडचा रॅपर हनी सिंगच्या गाण्याची क्रेझ तरूणाईमध्ये आजही कायम आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये हनी सिंगचे गाणे आहेत. हनी सिंगने सर्वांनाच आपल्या तालावर ठेका धरायला लावला होता. शाहरूखने सुद्धा त्याच्या गाण्यावर ठेका धरला होता. शाहरूखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटात हनी सिंगने ‘लुंगी डान्स’ हे गाणं बनवलं होतं. या गाण्याची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंगने सांगितले की, शाहरुखला ते गाणे आधी आवडले नव्हते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंगने ‘लुंगी डान्स’हे गाणं बनवतानाचा एक किस्सा सांगितला. राज शमानी सोबत साधलेल्या संवादात हनी सिंगने सांगितले की, “शाहरूखने एक इंग्रजी गाणे ऐकल्यावर मलाही माझ्या चित्रपटात असंच गाणं हवं आहे, असे त्याने मला सांगितले. जवळपास तीन तास त्याने चित्रपटाची कथा ऐकवली. त्यावर मी म्हणालो की, तुमच्या चित्रपटासाठी मी नवीन गाणे बनवतो. ते गाणं नक्कीच सुपरहिट होईल मला ठाऊक आहे. मी ते बनवून त्याला ते ऐकवले, पण ते गाणे काही त्यांना आवडले नाही. तर मी म्हणालो, जर तुम्हाला आवडलं नसेल तर, मी ते गाणं सिंगल प्रदर्शित करून टाकेल.”

शेवटी शाहरुखने त्याच्या चित्रपटात ते गाणे ठेवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची कथा चेन्नईत घडली होती. जिथे रजनीकांत हे सर्वात मोठे सुपरस्टार मानले जातात. या गाण्याच्या मदतीने शाहरुखला रजनीकांत यांना ट्रिब्यूट द्यायचा होता.

चित्रपटासोबतच ‘लुंगी डान्स’ हे गाणे देखील ब्लॉकबस्टर ठरले. गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाल्यामुळे शाहरूखने त्याच्या एका मुलाखतीत गाण्याचे आणि माझे कौतुक केले होते.

पुढे हनी सिंग म्हणतो, “मला ‘लुंगी डान्स’हे गाणं रजनीकांत यांच्यासाठी परफेक्ट वाटलं. या महान सेलिब्रिटीचा मी फॅन असल्याने त्यांच्या गाण्याचा मला व्हायचे होते. माझ्या विनंतीवरून दीपिकानेही या गाण्यासाठी होकार दिला. कारण ती रजनीकांत यांची खूप मोठी फॅन आहे.”

‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनेच केले होते. हा चित्रपटदेखील शाहरुख खानच्या सिनेकारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 33 कोटींची ओपनिंग करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण २२७ कोटींची कमाई केली.

मात्र, त्यानंतर शाहरुखचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण त्या नंतर ‘पठान’ चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दमदार कमाई केली. ‘चेन्नई एक्सप्रेस’ चा विक्रम मोडत शाहरूखचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला. केवळ शाहरुखच नाही तर ‘पठान’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला, त्या चित्रपटाने देशभरात ५०० कोटींहून अधिकची कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT