Saeeda Imtiaz: पाकिस्तानी अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात आढळला मृतदेह...

पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सईदा इम्तियाजने आत्महत्या केल्याचे वृत्त मिळत आहे.
Saeeda Imtiaz Passed Away
Saeeda Imtiaz Passed AwayInstgram/ @saeedaimtiaz

Saeeda Imtiaz Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी येत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सईदा इम्तियाजने आत्महत्या केल्याचे वृत्त मिळत आहे. सईदाच्या निधनाची बातमी तिच्या पीआर टीमने अधिकृतपणे जाहीर केली आहे. दिवंगत अभिनेत्रीच्या खोलीत तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळल्याचे वृत्त शेअर केले होते.

Saeeda Imtiaz Passed Away
81st Master Dinanath Mangeshkar Award: ८१ व्या दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा, या कलाकारांचा होणार गौरव

तिच्या मृत्युचे अद्याप कोणतेही गुढ उकलेलं नाही. सईदाच्या मृत्यूने पाकिस्तानच्या मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Marathi News)

सईदाने पाकिस्तानी चित्रपट 'कप्तान: द मेकिंग ऑफ ए लेजेंड'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. चित्रपटात तिने पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानची पुर्वाश्रमीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथची भूमिका साकारली होती. (Bollywood Actress)

सईदाच्या टीमने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. टीमच्या वतीने सोशल मीडियावर सांगितले की, 'आम्ही अत्यंत दु:खाने सांगत आहोत की सईदा इम्तियाज या जगात नाहीत. आज सकाळी ती तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

Saeeda Imtiaz Passed Away Social Media Post
Saeeda Imtiaz Passed Away Social Media Post Instagram/ @saeedaimtiaz

सईदाचा जन्म दुबईमध्ये झाला असून न्यूयॉर्कमध्ये ती लहानाची मोठी झाली आहे. तिने स्टोनी ब्रूक विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे. 'कप्तान' चित्रपटाव्यतिरिक्त सईदाने 'कुल्फी' चित्रपटात काम केले होते. यात तिच्यासोबत सहरोज सब्जवारी होती. (Entertainment News)

तिने 'वजूद' आणि 'रास्ता' सह अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. तिचा 'थोडी सेटिंग थोडा प्यार' हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. लवकरच तिचा तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

२०२१ मध्ये सईदा ट्रोलच्या निशाण्यावर आली, तेव्हा तिने बिकिनीमधील फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिला नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात ट्रोल केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com