'ये है मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) फेम अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदची बातमी दिली आहे. 'ये है मोहब्बतें' मालिकेने खूप लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. 'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्री शिरीन मिर्झाने नुकतीच गुडन्यूज दिली आहे. शिरीन मिर्झा (Shireen Mirza Pregnancy Announcement) लवकरच आई होणार आहे. ही बातमी तिने सोशल मीडियावर फोटो छान व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. शिरीनने नवऱ्यासोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे.
सध्या शिरीन मिर्झावर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "आमच्या प्रार्थना...अल्लाहने आमचे ऐकले आणि योग्य वेळी त्याने चमत्कार केला आणि आम्हाला आशीर्वाद दिला. लवकरच आमचे बाळ येणार आहे. पालक म्हणून आमचा हा नवीन प्रवास सुरू होत आहे. हे अल्लाह आमच्या मुलांचे संरक्षण कर आणि त्यांना वाढवण्यासाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन कर. आम्ही बाळासाठी खूपच उत्सुक आहोत."
शिरीन मिर्झा व्हिडीओमध्ये पती हसन सरताजसोबत (Hasan Sartaj ) शेतात फिरताना पाहायला मिळत आहे. शिरीन मिर्झा ने काळ्या रंगाचा सुंदर वेस्टन ड्रेस परिधान केला आहे. मोकळे केस आणि मिनीमल मेकअप लूक तिने केला आहे. शिरीन मिर्झा व्हिडीओत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिरीनने सोनोग्राफीची झलख देखील दाखवली आहे. दोघेही एकत्र खूपच आनंदी दिसत आहे.
शिरीन मिर्झा आणि हसन सरताज यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या चार वर्षांनी शिरीन मिर्झा आणि हसन सरताज आई-बाबा होणार आहे. शिरीन मिर्झाची 'ये है मोहब्बतें' मालिकेतील भूमिका खूप गाजली होती. यामुळे शिरीन मिर्झा देखील खूप लोकप्रियता मिळाली. शिरीनचे चाहते तिच्या बाळाची आणि आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.