Yashoda Goshta Shyamchya Aaichi Serial Off Air Instagram
मनोरंजन बातम्या

Yashoda Goshta Shyamchya Aaichi Serial Off Air: दर्जेदार विषय असूनही TRP ने घातला घोळ, 'झी मराठी'वरील लाडकी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Yashoda Goshta Shyamchya Aaichi Serial: टीआरपी अभावी झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली एक मालिका लवकरच बंद होत आहे.

Chetan Bodke

Yashoda Goshta Shyamchya Aaichi Serial Off Air: अनेक टेलिव्हिजन सिरीयल टीआरपीमध्ये येण्यासाठी खूपच धडपड करताना दिसून येत आहे. सध्या झी मराठीवरील अनेक सिरीयल्स टीआरपीमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरू करत आहेत.

उत्तम आशय असलेल्या या मालिकेची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते. पण टीआरपी अभावी झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली एक मालिका लवकरच बंद होत आहे. झी मराठीवर प्रसारित होणारी ‘यशोदा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

सध्या बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे झी मराठीने ती मालिका बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नुकतेच झी मराठीवर प्रसारित होणारी ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

मालिकेच्या शेवटच्या भागाची शूटिंग झाली असून मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांनी आजवरच्या प्रवासात साथ दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पण चांगल्या आशयाची मालिका बंद होत असल्याने नेटकऱ्यांनी वाहिनीला चांगलंच धारेवर धरलं आहे.

मालिका बंद होण्याविषयीची बातमी एका सोशल मीडिया पेजने शेअर केली आहे. मराठी टेलिबझ या इन्स्टाग्राम पेजने याविषयीचे वृत्त दिले असून मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अद्याप मालिकेचा शेवटचा भाग कधी पर्यंत टेलिकास्ट केला जाईल, याबद्दलची माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मालिकेतील सर्व कलाकार देखील दिसत आहेत. चांगल्या आशयाच्या मालिकाबंद होत असल्यामुळे सध्या प्रेक्षक नाराज आहेत.

मालिकेविषयी बोलायचे तर, ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वा. झी मराठी वाहिनीवर टेलिकास्ट होते. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत रोहिणी हट्टगंडी, नयना आपटे- जोशी, अभिजित चव्हाण, वरदा देवधर सह अनेक सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT