Sai Tamhankar
Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: सई म्हणते, "कोकणची माणसं साधी भोळी", 'या' भाषेत चित्रपट करण्याची खास आवड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाचा ठसा मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत कायम ठेवला आहे. सई सध्या मराठी चित्रपटाने नाही तर हिंदी चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. तिचा आगामी चित्रपट 'इंडियन लॉकडाऊन'मुळे बरीच चर्चेत दिसत आहे. तिचा हा साधा लूक सर्वांनाच खरंतर भावला आहे.

नेहमीच सोशल मीडियावर सई सक्रिय असते. आपले खास अंदाजातील फोटो सई सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा इफ्फी पुरस्कार गोव्यात सुरु आहे.या पुरस्कार सोहळ्याला भारतासह परदेशातील कलाकार मंडळी आपली उपस्थिती दर्शवत आहे. यावेळी अभिनेत्री सईनेही उपस्थिती लावली होती.

"मी इफ्फी पुरस्कारासाठी फारच आतूर असते. यावेळी मी 'इंडियन लॉकडाऊन' चित्रपट घेऊन सज्ज झाली आहे. आपण सर्वांनीच लॉकडाऊनचा सामना केला होता. त्यावेळच्या घटनेवर आधारित हा चित्रपट असून चित्रपटात लॉकडाऊनमधील काहीच दृश्ये नाहीत.

उलट या काळातील आशेचे किरण असलेल्या बाबींवर भर देण्यात आला आहे. नक्कीच चित्रपट हा प्रेक्षकांना आवडणार असल्याची मला खात्री आहे. चित्रपटाला इफ्फीसारखे व्यासपीठ मिळणे माझ्यासाठी फार महत्वाची बाब आहे." इफ्फी पुरस्कारानिमित्त यावेळी सई म्हणाली.

सोबतच सई थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल म्हणते, "भारतीयांचा सर्वाधिक आवडीचा मनोरंजनाचं माध्यम म्हणजे, क्रिकेट आणि चित्रपट. कुठल्याही व्यासपीठावरील दर्जेदार आशय प्रेक्षक पाहत असतात.

चित्रपटासाठी प्रेक्षक सिनेमागृहातच जातात पण, इतर आशयांसाठी प्रेक्षकांना ओटीटीचाच आधार घ्यावा लागतो. हे आता प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या यशातून दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांपर्यंत मनोरंजन पोहोचवायचे असल्याने ओटीटी हे माध्यम उत्तम होते. प्रेक्षकांनी लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक वापर ओटीटीचा केला होता."

सध्या सई गोव्यात इफ्फी पुरस्कारासाठी आहे. त्यावेळी ती माध्यमांशी बोलताना सांगते की, "गोवा माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. मी इथे कित्येक वर्षांपासून येत आहे. हे ठिकाण असे आहे की, जरी आपण कामानिमित्त गोव्यात आलो असलो तरी आपल्याला इथे सुट्टी घालवण्यासाठी आलो असल्याचे वाटते. येथील खाद्यसंस्कृती, पारंपारिक खाद्यपदार्थ हे खरंच मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते."

सोबतच सईपुढे बोलते, "इथले लोकही प्रेमळ स्वभावाचे आहे, सोबतच कोकणी भाषाही मला फार आवडते. या भाषेतून जरी मला ओरडले तरी ती भाषा मनाला भावते, इतकी भाषा प्रेमळ आहे. अगदी 'कोकणची माणसं साधी भोळी' या गाण्याप्रमाणे. मी माझ्या मित्रांसोबत कोकणी भाषेत बोलत असते. मला जर कोकणी भाषेतील चित्रपट करण्यासाठी सांगितले तर मी नक्की तो चित्रपट करणार." असे यावेळी सई बोलली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT